पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीटचें कमिशन. ( १५७ ) त्रिक बडोदे येथे मरण पावला. त्याची बायको रतनबाई मात्र जिवंत होती. दुसरे वर्षी हरी हा पुण्यास वारला. त्याला दोन स्त्रिया होत्या, त्यापैकी एकीस कंन्या होती. ह्या दोन्ही स्त्रिया तो मेल्यावर लवकरच मेल्या. हे दोघे बंधु जिवंत असतां जेष्ठ भक्ति आपला भाचा सामळ याच्या मदतीने बडोद्याच्या पेढीचे काम चालवीत असे, आणि धाकटा हरी आपला दुसरा भाचा दुलभ याच्या सहाय्याने पुण्याच्या पेढीचें काम करीत असे. हे दोघे मेल्यावर भक्तीची स्त्री रतनबाई इजकडे मालकी आली. तिनें दुलभ यास पुण्याच्या पेढीचे काम चालविण्यासाठी आपल्या तर्फे मुनीम नेमिला. तीन वर्षेपर्यंत त्याणे मुनिमाच्या नात्याने काम केलें, परंतु पुढे त्याणे असे प्रसिद्धीस आणिलें कीं, मी हरीचा वारस आहे, आणि पुण्यांतील सर्व मिळकत आपल्या ताब्यांत घेतली. हैं रतनबाईस कळल्यावर ती आपला भाचा सामळ यास बरोबर घेऊन पुण्यास आली, आणि तिनें दुलभ याजपाशीं दुकानचा हिशेब मागितला, आणि त्या कामांत तिला यश आले. - ता० १५ डिसेंबर सन १८०३ रोजी पुण्याच्या दरबारच्या परवानगीनें तिनें सामळ यास दत्तक घेतलें. याप्रमाणें हरी आणि भक्ति यांचे मिळकतीचा सामळ हा मालक झाला. रतनबाई सन १८०६ चे सालांत बडोद्यास आली, आणि ता० ११ आगस्ट सन १८०८ रोजी मरण पावली. तेव्हांपासून सामळ भक्ति हा मिळक- तीचा पूर्ण मालक झाला. सामळही ता० ५ आगस्ट सन १८०९ रोजी बडोदे येथें मरण पावला. त्यास पुत्र संतती नव्हती, सबब त्याची स्त्री आचरतबाई हिणें आपल्या नवऱ्याचे त्याच्या मर- णापूर्वी संमत घेतलें होतें, त्याप्रमाणे बेचर नांवाच्या गोत्र पुरुषास दत्तक घेतलें. गायकवाड सरकारानी हा दत्तक मंजूर करून त्यास सनद करून दिली, आणि दरबा- रचा पोतदारीचा हक्कही त्याजकडे कायम ठेविला. कागदपत्र सर्व बेचर यांचे नांवानें झाले, परंतु खरी मालकी काय ती आचरत बाईचीच होती. बेचर सामळ हा हरी भक्तीचा वारस कबूल करून त्या दुकानास इंग्रेज सरका- रानों जी जामीनगिरी दिली होती ती त्या वेळचे रेसिडेंट सर जेम्स कारन्याक याण तोंडाने कबूल केली, आणि सन १८२० चे सालीं गायकवाडानीं करून दिलेल्या सनदेवर इंग्रेज सरकारच्या रेसिडेंटाने शेरा लिहिला तोपर्यंत नुसत्या तोंडच्या कबुला- यतीवरच ती चालली होती. कांही वर्षेपर्यंत बेचरभाई यानी हरीभक्तीच्या संपत्तीचा निर्वेध उपभोग घेतला, परंतु सन १८१५ चे सालीं सामळ याचा भाऊ दुलभ यास पेशव्यांचा पूर्ण आश्रय अस- ल्यामुळे आपण मालक आहोत असा त्याने दावा केला, परंतु तो कबूल झाला नाहीं. नंतर सन १८२७ चे सालीं दुलभचा मुलगा धरमदास याण पुनः उठावणी केली होती, परंतु त्यांतही त्यास जय मिळाला नाहीं. बेचर सामळ ता० १४ सप्टेंबर सन १८४५ रोजी मरण पावला. त्याच्या मरणा- पूर्वी दुकानचे सर्व काम बाबा नाफडे पहात होते, आणि मरणाचे वेळेस बेचर याणी बाबा याजला विश्वासाने सर्व अधिकाराची सोपणूक केली होती, व गायकवाडांचाही