पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- चौथें प्रकरण वतनदार लोकांची वतनें जप्त केल्याबद्दल. कमिशनाच्या प्रोसिडिंगावरून असे दिसते की, त्यानीं वतनदार लोकांच्या फिर्यादी समक्ष ऐकिल्या नाहींत. दरबारच्या कामदारांनी कबूल केले की, खंडेराव महाराज पानी सर्व वतनदार लोकांचीं वतने जप्त करून चौकशी केल्यावर ज्या वतनांबद्दल योग्य पुरावा होईल ती परत द्यावयाची असा ठराव केला होता. कमिशनानीं याबद्दल अभिप्राय असा दिला आहे की, याविषयीं मल्हारराव महाराज यांवर इतकीच जबाबदारी आहे कीं, त्यानी वतनांवरील जप्ती दूर केली नाहीं, परंतु आतां त्यानीं जप्ती उठविण्याचे कबूल केले आहे. कमिशनास एवढीच सूचना करावयाची आहे की, विलंब न करतां वतनांबद्दल न्यायाच्या रीतीने उलगडा करण्या विषयीं महाराजांस सला द्यावी म्हणजे वतनदार लोकांत जी काळजी व असमाधान उत्पन्न झाले आहे तें दूर होईल. पांचवें प्रकरण सावकार लोकांच्या फिर्यादीबद्दल. कमिशनापुढे काय त्या चार सावकारांच्या फिर्यादी होत्या. त्यांपैकी हरीभक्ति आणि सामळ बेचर यांच्या पेढीच्या मालकांच्या फिर्यादी मोठ्या महत्वाच्या होत्या, आणि या दोन्ही दुकानांचा संबंध गायकवाड सरकारच्या राज्याशी फार दिवसांपासून चालत आलेला होता. त्याला अनुसरून मल्हारराव महाराज यानी जशी या लोकांशी वागणूक करावयाची होती तशी न केल्यामुळे त्यांच्या वर्तनावर कमिशनानी जी टीका केली आहे तीस ते अगदीं पात्र होते; यासाठी त्याबद्दल येथे तपशीलवार सांगितले पाहिजे. एक फिर्याद हरीभक्ति या नांवाची जी बडोद्यांत प्रख्यात पेढी आहे त्याच्या मालकानें केली होती. जरी विषयांतर झाले तरी चिंता नाहीं. हरीभक्तीच्या पेढीविषयीं संक्षेपाने येथें निरू- पण केलें असतां वाचकांस या मोठ्या घराण्यासंबंधी चांगली माहिती होईल. या घरा- ण्याच्या चरित्रांत कांहीं कांही गोष्टी फार चमत्कारिक येतील. बिसालाड जातीचा वाणी लक्ष्मीदास यांस हरी आणि भक्ति या नांवाचे दोन पुत्र होते. लक्ष्मीदास यांजपाशीं कांहीं पुष्कळ द्रव्य नव्हतें, तो बडोद्यांत राहात असे. हरी आणि भक्ति यांणी भागिदारीने बडोद्याच्या आणि पुण्याच्या दरबारांमध्ये पैशासंबंधी व्यवहारांत देवघेव करून पुष्कळ संपत्ती मिळविली. लक्ष्मीदास यांस दोन मुलांखेरीज एक कंन्या होती, आणि तिचें भुकण नांवाच्या एका वाण्याबरोबर लग्न केलें होतें. त्यास तीन मुलगे होते. नंदलाल, सामळ आणि दुलभ यांचे पालनपोषण त्यांच्या मातुल गृहीच झाले, सन १९७९४-९५ चे सालांत भक्ति निपु-