पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १५२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. महाराज यानी घेतले होते, आणि त्या रीतीस अनुसरून मल्हारराव महाराज यानी -गादीनजराणा हें निमित्त करून जमिनीवरील धायपेक्षां ज्यास्त पैसा घेण्याविशीं हुकूम • दिला मिळून मल्हारराव महाराज यांच्या कृत्यास मागील वहिवाटीचा आधार आहेच. असे, आतां ही गोष्ट खरी आहे कीं, धान्याचा भाव उतरल्यामुळे हा जबर कर देण्याविषयीं रयतेमध्यें सामर्थ्य राहिले नव्हते व ती गोष्ट राष्ट्राच्या हितेच्छु लोकांन महाराजांस निक्षून सांगितली होती, परंतु त्यांस ती रुचली नव्हती. आतां शरीरसंबंधी रय- तेवर जुलूम करण्याबद्दल (कलम १) कमिशनापुढे ज्या साक्षी झाल्या आहेत त्यांच्या खरेपणा- विषयों संशय घेण्यास कारण आहे. गायकवाडचे राज्य कितीही जुलमी मानिलें असो, रयतेपासून पैसा वसूल करण्यासाठी रयतेच्या पाठीवर दगड देऊन त्यांस उन्हांत उभे केल्याबद्दल मल्हारराव महाराज यांच्या कारकीदी पूर्वी कोणी कधीं फिर्याद केली होती असे ऐकिश्यांत च पाहण्यांत नाहीं. रयतेवर मोहोसल करावा व त्यांच्या शेतीचा माल जप्त करावा हाच काय तो सक्त उपाय करण्यांत येत आणि कदाचित् त्यांस पाहऱ्यांत बसवीत असतील असे असून कांहीं लोकांनी शरीरसंबंधी जुलूम झाल्याबद्दल कमि- शनापुढे फिर्यादी केल्या तेव्हां दरबारचे कामदारांस मोठे नवल वाटले. त्यानीं कमिशनास अशी विनंती केली कीं, गाइकवाडाच्या राज्यांत धारा वसूल करण्याकरितां रयतेवर शरीरसंबंधी जुलूम करण्याची चाल नाहीं, यासाठी कमिशनापुढे ज्या साक्षी झाल्या आहेत त्या रद्द करण्यासाठी आम्ही पुष्कळ लोक साक्षीसाठी आणण्यास तयार आहोत. कमिशनानीं त्याचें उत्तर असे दिलें की जुलूम झाल्याबद्दल जसे लोक साक्षी देतात तसे जुलूम करण्याची रीत नाहीं, आशा साक्षी लोक देतील त्यांत कांही अर्थ नाहीं, परंतु ज्या लोकांनी आपणावर जुलूम झाल्याचे सांगून दुसऱ्यावर जुलूम झाल्याबद्दल सांगितलें आहे ते लोक जर कमिशनापुढे साक्षी देतील कीं, आह्मावर जुलूम झाला नाहीं तर ते साक्षीदार महत्वाचे मानले जातील. दरबारचे कामदारांनीं कामेशनास असे कळविलें कीं, कमिशनापुढे ज्या लोकांनी साक्षी दिल्या आहेत त्यानीं मोहोगम अमुक संख्येच्या मनुष्यावर जुलूम झाला असें सांगितलें आहे, त्यांची नावे सांगितलीं नाहींत तेव्हां ते लोक कोणते हे समजल्यावांचून आम्ही त्यांस कसें हजर करावे? पाहिजेल तर त्या गांवचे मुख्य पाटील लोकांस हजर कमिशनापुढे साक्षी देणार लोकांस खोटे पाडण्यास आह्मी तयार आहोत, आणि प्रमाणे दरबारच्या जबाबांतही लिहिले, परंतु कमिशनानीं तो पुरावा घेतला नाही. त्यानी दरबारच्या कामदारांस असा जबाब दिला कीं, ज्या लोकांनीं जुलूम झाल्याबद्दल साक्षी दिल्या आहेत, त्याच्या विरुद्ध दुसऱ्या लोकांनीं जुलूम करण्याची रीत नाहीं, अशा जरी साक्षी दिल्या तरी त्यांचे आम्ही महत्व मानणार नाहीं; कारण देशी राज्यांत पुष्कळ ठिकाणी असे जुलूम होत असतात; येथेच झाले आहेत असें नाहीं. करून देशी राजांच्या राज्यांत सरकारच्या धारा वसूल करण्याकरितां शरीरसंबंधी जुलूम करण्याची चाल आहे असे कमिशनाच्या मनांत भरले होते यामुळे त्यानी दरबारच्या म्हणण्याकडे विशेष लक्ष दिले नाहीं असें दिसतें.