पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. (१५३) गुन्हा कबूल करण्याकरितां संशयित मनुष्यावर जुलूम करूं नये असा इंग्रज सरकारानी कायदा केलेला आहे, तथापि पोलीसच्या लोकांकडून लोकांवर जुलूम होतातच, आणि त्याबद्दल त्या लोकांस कडक शिक्षा झाल्या असतांही तो क्रम बंद होत नाहीं. त्याप्रमाणे बडोद्याच्या दरबारची सक्त मनाई असतां कामदार लोकांकडून रयतेवर पैसा वसूल करण्यासाठी अगदी जुलूम होत नसेल असे म्हणवत नाहीं, परंतु मल्हारराव महाराज यानीं किंवा त्यांच्या पूर्वजानी सरकारचा पैसा वसूल करण्यासाठी शरीरसंबंधी जुलूम करावा असा कायदा घालून दिला होता किंवा तशा कृत्याकडेस कानाडोळा करून आपली गर्भित संमति दिली होती असे मुळींच नाहीं. त्याहून उलट अशा जुलमाबद्दल फिर्यादी झाल्यावरून चौकशी करून अपराधी लोकांस कडक शासने केल्याची प्रमाणे आहेत व अशा प्रकारचा कोणी जुलूम करूं नये असा मल्हारराव महाराज यानी तर कमिशन बसण्यापूर्वी जाहिरनामा प्रसिद्ध करविला होता. त्याची नक्कल ब्ल्यु बुक नंबर १ पान २८२ वर छापिली आहे ती पहा म्हणजे या अपवादापासून बडोद्याचे दरबार मोकळे होतें असें ध्यानांत येईल. इनामदार लोकांवर इनामकमेटीबद्दल खंडेराव महाराज यानी नवा कर बसविला त्या बद्दल इनामदारांस कांही मोबदला मिळत नाहीं असे कारण लावून त्या कराविषयीं कमिशनाने आपली नाखुषी दाखविली आहे. त्या संबंधानें येथें लोकांच्या दृष्टोत्पतीस इतकेच आणावयाचे आहे कीं, मल्हारराव महाराज यांस राज्यपद मिळाल्यानंतर त्यानी धर्मादाय दिलेल्या जमिनींवर जो इनामकमेटीचा कर होता तो अजीबात काढून टाकिला. भाऊ शिंदे यानीं आपल्या दिवाणगिरीत सर्व प्रकारच्या हक्क- दारांच्या जमिनी जप्त केल्या होत्या. आणि इनामकमेटीचा कर बसवितांना जी चौकशी झाली होती ती रद्द करून त्यास पुनः नवी चौकशी करून सर्व हक्कदारांच्या जमिनींचा अपहार करावयाचा होता यामुळे फार गवगवा झाला होता. ज्या लोकांकडे धर्मादाय जमिनी होत्या ते बिनतकार आपल्या इनामावरील हक्क देण्यास तयार होते आणि मल्हारराव महाराजानी इनामकमेटीचा कर घेऊन जमिनीवरील जप्ती उठविण्याविषयीं हुकूम दिला असता तर तेवढ्याने देखील लोक फार खुषी झाले असते. कर काढून टाकण्यापासून ते लोक किती सुखी झाले हें सांगण्यास नको. मग अजीबाद आतां खंडेराव महाराज यानी इनामजमिनींवर कर बसविला हे कमिशनास पसंत वाटलें नाहीं; परंतु त्यानी इनामदार लोकांच्या जमिनींबद्दल चौकशी करण्यासाठी खंडेराव महाराज यानी जो कायदा पसार केला तो पाहिला असता आणि त्या कायद्याची जशी त्यानी विजापूरच्या ठाकुराच्या गांवाशी सुरत जिल्ह्यांतील जमीनदार लोकांच्या गांवाची तुलना करून निःपपक्षातपणे अभिप्राय दिला तशी इंग्रज सरकारच्या इनामकमि- शनच्या कायद्याशी तुलना केली असती तर खंडेराव यांचा कायदा फार सौम्य आणि इनामदार लोकांस पराकाष्ठेचा हितकारक होता असे त्यांस' वाटले असतें आणि त्यानी 'याबद्दल महाराजांची प्रशंसा केली असती. २०.