पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचें कमिशन. (989) ज्या ठाकूर लोकांच्या फिर्यादींची चौकशी करण्यासाठी मुद्दाम कमिशन नेमावे. म्हणून रेसिडेंट साहेब यानी मुंबई सरकारास शिफारस केली होती त्यांचा कमिशना- पुढे वर लिहिल्याप्रमाणे निकाल झाला, याबद्दल खरोखर मोठे समाधान वाटते. कर्नल फेर यांच्या समजुतीप्रमाणे पाहतां ठाकूर लोकांचा एकही दावा त्यांस गैर- वाजवी वाटला नव्हता. गायकवाडानी त्यांच्या सल्याप्रमाणे जर ठाकूर लोकांच्या दाव्याचा निकाल करण्याचे मनांत आणिलें असतें तर, त्या लोकांचें सर्व मागणें मान्य केल्यावांचून दुसरे काही गत्यंतरच नाहीं अशी कर्नल फेर यांच्या कारकीर्दीत मल्हार - राव महाराज यांची स्थिति झाली होती. काठेवाडांतील व महिकाठ्यांतील राजेरजवाडे यांजपासून गायकवाड सरकार जी खंडणी घेतात तीस घांसदाणा' अशी संज्ञा आहे. ती वसूल करण्याकरितां गायकवाड आपली फौज पाठवीत असत. सन १८२० चे सालांत तो खंडणीचा ऐवज इंग्रज सरकारानी वसूल करून द्यावा असा करार झाल्यावरून तो अधिकार इंग्रज सरकाराकडेस गेला आहे. कर्नल फेर यांचें म्हणणें असें होतें कीं, महिकाठ्यांतील संस्थानिकांप्रमाणे या ठाकूर लोकांपासून घांसदाण्याबद्दल एक ठरीव रक्कम घेण्याचा मात्र गायकवाड सरकारचा हक्क असून जमाबंदी वाढविण्याचा हक्क नाहीं. तात्पर्य महिकाठयांतील संस्थानिकांच्या पदवीस या ठाकूर लोकांस बसवून गायकवाड सरकारच्या हुकुमतींतून त्यांस काढावे, हाच काय तो कर्नल फेर यांचा हेतु होता. हा त्यांचा दुराग्रह स्वराज्य सत्तेस किती अपायकारक होता है विस्तारेंकरून सांगण्याची जरूरी नाहीं. याविषयों कमिशनानी असा अभिप्राय दिला आहे की, महिकाठ्यांतील ठाकूर लोकांबद्दल इंग्रज सरकार आणि गायकवाड सरकार यांजमध्ये तहनामे होऊन त्यांजपासून एक ठरीव रक्कम घ्यावी असा नियम झाला आहे. त्याप्रमाणे विजापुरच्या ठाकुराबद्दल काहीएक करार झाला नसून गायकवाडांची इतर प्रजेवर जशी सत्ता आहे तशीच या ठाकूर लोकांवरही त्यांची अप्रति- बंध सत्ता आहे.* (मागील पृष्ठावरून.) सरकारचाही झाला असता. कमिशनच्या या अभिप्रायावर नामदार मि० राजर्स साहेबानी जे आक्षेप घेतले होते ते अगदीं पोकळ आहेत हैं आतां येथें निराळे सांगण्याची जरूरीच उरली नाहीं; त्याजबद्दल मुंबई हायकोर्टाचा निवाडाच साक्ष देत आहे. सुरत जिल्ह्यापैकीं रेव्हेन्यु खात्यांतील हैं प्रकरण कमिशनच्या नजरेस त्यांतीलच एक सभासद मि० रेव्हन्स्क्राफ्ट साहेब यानी आणलें असावें असें मानण्यास पुष्कळ सबळ कारणें आहेत; व तसें त्यानीं केल्याबद्दल त्यांची जितकी स्तुति करावी तितकी थोडीच. स्वतःच्या कारकीर्दीचा असा प्रकार असतांना सर फिलिप हौस व त्यांचे कौन्सिलर मल्हारराव महाराजांस दोष देण्यास कोणत्या तोंडानें तयार झाले होते हैं समजत नाहीं. "The Thakoors' claim that they are precisely in the same position as their relatives in the Mahi Kanta in respect of their payments to the Gaekwar's Govern- ment, is evidently untenable. In the case of the latter a permanent settlement of the [ Forward.