पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. ( १४५ ) बरोबर लोकांच्या सुरक्षितपणासाठीं तो न होऊं देण्याचा अगोदर उपाय योजून मग त्या दंग्याचे मूळ कशापासून उत्पन्न झाले याचा शोध करावयाचा ही सर्वमान्य राजनीति च कामाची रीत आहे, मग दंगा झाला आहे असे समजल्यावर तो मोडण्यासाठी तात्का- लिक उपाय योजण्याची किती जरूर आहे ते सांगावयास नको. नामदार गवरनर जनरल साहेब यांचे मात्र या गोष्टीकडे लक्ष गेले. त्याणी नंबर २२०७ तारीख १६ सप्टेंबर सन १८७३ रोजी मुंबई सरकारास पत्र लिहिलें त्यांतील सहावे कलमांत असे फर्माविलें होतें कीं, ठाकूर लोकांस त्यांच्या घरी येऊन शांतपणे राहण्याविषयीं रेसिडेंट साहेब याण भाग पाडावे. सामोपचाराचें सांगणें ठाकूर लोकांनों नाकबूल केले तर तहनाम्याप्रमाणे सबसिडियरी फौजेचा उपयोग करून त्यांस ताळ्यावर आणावे. गवरनर जनरल अशी सूचना करीपर्यंत ही गोष्ट रेसिडेंट साहेब यांचे मनांत सुद्धां येऊं नये, व त्याबद्दल मुंबई सरकारानी देखील रेसिडेंट यांस कांही हुकूम देऊ नये हें आश्चर्य नव्हे काय ? दंगा मोडला पाहिजे ही गोष्ट रेसिडेंट साहेब यानी मनांत आणिली असती म्हणजे लागलीच त्यांस असें समजलें असतें कीं, दिवाणाने कळविलेली बातमी खोटी होती, आणि मग मोहोरीचा जो मेरू झाला तो सहज टळला असता, परंतु जसे काय रेसिडेंट यांस तसे कांहीं कर्तव्यच नव्हते. त्यांस मल्हारराव महाराज यांचा राज्यकारभार जितका वाईट होता त्यापेक्षांही ज्यास्त वाईट आहे असे दाख- चावयाचे होतें. आता आपण या गोष्टीकडे लक्ष देऊं कीं, विजापूर परगण्यांतील सात गांवचे ठाकूर लोकांवर तरी खरोखर गायकवाडानीं अगदीं अन्यायाचा जुलूम केला होता असे कमि- शनाचे विचारास आले की काय ? ठाकूर लोकांनी कमिशनापुढे दरबारावर सोळा दावे आणिले होते. त्यांपैकी कमि शन यांस काय ते तीनच दावे चौकशी करण्या योग्य दिसले ते हे:- १. ठाकूर लोक ज्यास घनदाणा म्हणतात, ती जमाबंदीची रक्कम वाढविण्याचा दरबारास हक्क आहे की नाहीं ? २. मिरास हक्क कमी केले, व त्यांजवर रुपयास दोन आगे नवा कर बसवि- ल्याबद्दल, ठाकूर लोक यांची फिर्याद वाजवी आहे कीं काय ? ३. मल्हारराव महाराज गादीवर बसल्याबद्दल ठाकूर लोकांजवळ जो नजराणा मागतात तो त्यांस दिला पाहिजे की काय ? या तिन्ही बाबतीविषयों कमिशन याने अभिप्राय दिलें ते असे:- पहिल्या कलमाविषय कमिशन यांचे म्हणणे असे आहे कीं, त्याबद्दल ठाकूर लोकांनी कोही करारनामा, अथवा सनद रुजू केली नसून, घाँसदाण्याबद्दलची रक्कम एकसारखीच राहील अशी गायकवाडानी जामिनकी दिली होती. किंवा तशी वहिवाट चालत आली १९.