पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १४४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- साहेब यांस तपशील सांगितला असतां त्यानी बंडाव्याबद्दल त्या वकिलास एक शब्द देखील विचारिला नाहीं हें काय ? बडोद्याचा दिवाण अगदी ज्ञानशून्य होता. त्यास ज्याच्या खरेपणाविषयीं खात्री नाहीं असा मजकूर रेसिडेंट साहेब यांस कळविल्यानें त्यांस दोषारोप करण्यास किती मोठे द्वार सांपडेल याविषयीं ज्ञान नव्हते. आणि ठाकूर लोकांचा अतिक्रम वाढवून सांगितल्याने रेसिडेंट साहेब यांच्या मदतीने त्या लोकांपासून नणारा वसूल करता येईल असे त्या दिवाणास वाटले असेल तर त्यांत नवल नाहीं; कारण ठाकूर लोकांपासून नजराणा वसूल करण्याकरितां सबसिडियरी फौजेची मदत द्यावी, अशी रेसिडेंट साहेब यांस त्याने विनंती केली होती. परंतु कर्नल फेर यांचा प्रकार तसा नव्हता. ते फार शहाणे होते. गायकवाड सरकारच्या हितासाठीं त्याबद्दलची बरोबर चौकशी करून ठाकूर लोकांनी कांहीं बंडावा करूं नये असा बंदोबस्त करण्याची त्यांस जरूरी वाटली नसेल तर नसो, परंतु या ठाकूर लोकांच्या बंडाव्यापासून अमदाबाद जिल्ह्यास व त्या जिल्ह्याच्या आसपासच्या मुलुखांस उपद्रव होण्याचा संभव आहे, असे ज्यापेक्षां त्यांस वाटले होते, त्यापेक्षां त्या मुलुखाच्या सुरक्षितपणासाठी तरी निदान त्यान याबद्दल चौकशी करून दिवाणानीं कळविलेला मजकूर खोटा किंवा खरा याची खात्री करून घेऊन मग मुंबई सरकारास जे कांहीं कळवि- ण्याचे जरूर झाले होतें तें कळवावयाचे होतें. त्याप्रमाणे त्यानी कांहींएक केले नाहीं, इतकेच नाहीं, पण बडोद्याच्या दिवाणाने जे कांही कळविले ते जसे काय ठाकूर लोकांचा बकील आपणाकडे आल्यानंतर विशेष दृढ झाले अशा प्रकारे त्यानी मुंबई सरकारास तारीख ४ जुलई सन १८७३ रोजी रिपोर्ट केला होता. केवळ दिवाणाच्याच सांगण्यावर त्यानी भरंवसा ठेवला नव्हता, पण कमिशनाच्या लेखांत त्या संबंधी कांहीं मजकूर नाहीं. त्यांनी याबद्दलचा सर्व दोष दिवाणावर ठेविला आहे. यावरून ठाकूर लोकांचा वकील रेसिडें- टाकडे आला होता हे त्यांच्या लक्षांत आले नाहीं असे दिसते. * दुसरी एक गोष्ट येथें लक्षांत घेण्यामोगी आहे. ठाकूर लोकांच्या बंडापासून अम- दाबाद जिल्ह्यास व त्याच्या आसपासच्या मुलुखास उपद्रव होण्याचा संभव आहे, असे रेसिडेंट साहेब यानी गृहित केले असतां दंगा मोडून टाकण्यासाठी अगोदर जरूरीचे उपाय योजण्याविषयीं मुंबई सरकारास एक शब्दही त्याणी लिहिला नव्हता, व मुंबई सरकार यानींही त्याबद्दल रेसिडेंट साहेब यांस कांहीं हुकूम दिला नव्हता. लोकांच्या दाव्याबद्दल गायकवाड सरकारानी चौकशी करून ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांस दाद द्यावी हाच काय तो रेसिडेंट साहेब यांचा आग्रह होता, आणि तो देखील वाजवी नव्हता; कारण कमिशनापुढे बहुत करून सर्व दावे नामंजूर झाले आहेत. तें असो, परंतु दंगा आहे असा संशय उत्पन्न झाल्या- ठाकूर लोकांचे उत्पन्न होणार ठाकर In continuation of my confidential letter No. 107-573 dated 28th ultimo, and with reference to paragraph 2, I have the honour to report that this morning a Vakeel appeared at the Residency on behalf of the five Thakoors in question, and as the Minister would attend in one hour or two, I ordered him to await his arrival. (Baroda Blue Book No. I. Page 10. )