पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचें कमिशन. (१४३) कर्नल फेर यानी केलेले निवेदन ठाकूर लोकांस अनुलक्षून होते. त्याखेरीज राज्याच्या सुरक्षितपणास अपायकारक असे कांहीं दुसरे बखेडे होऊं लागल्याबद्दल रेसिडेंट साहेब यानी मुंबई सरकारास, अथवा मुंबई सरकारानी हिंदुस्थान सरकारास कळविलें होतें असे प्रसिद्ध झालेल्या पत्रव्यवहारावरून तर दिसत नाहीं. ठाकूर लोकांचा मोकदमा गवरनर जनरल यानी मोठ्या महत्वाचा मानिला होता, सबब कमिशनानीं त्याची चौकशी विशेष काळजीपूर्वक केली होती, असें त्यांच्या लेखावरून दिसते. ठाकूर लोकांनी गायकवाड सरकारच्या जुलमाबद्दल जी गहाण सांगितली होती, त्याचा परिणाम काय झाला हे मग सांगण्यांत येईल. अगोदर फक्त येवढेंच व्यक्त करावयाचे आहे की, ते लोक उघडपणे बंड करण्यास प्रवृत्त झाले होते, हे कर्नल फेर यांचे निश्चयपूर्वक सांगणे खरे झाले की काय? आणि त्या बंडापासून अमदाबाद जिल्ह्यास, आणि दुसऱ्या आसपासच्या इंग्रज सरकारच्या आश्रया- खालच्या संस्थानांस उपद्रव होण्याचे त्यानी भविष्य केलें होतें, तर तसा कांही संभव होता कीं काय ? कमिशन यानी ठाकूर लोक बंड करण्यास प्रवृत्त झाले होते कीं काय, याबद्दल चौकशी करून अर्मे लिहिले आहे की, आम्ही ठाकूर लोकांस याबद्दल जेव्हां प्रश्न विचारला तेव्हां त्यांस मोठा अचंबा वाटला. ठाकूर लोकांपैकी किंवा त्यांच्या अनुयायी कोळी लोकांपैकी एक मनुष्य देखील बंड करण्याच्या हेतूने म्हणून गांव सोडून बाहेर गेला नव्हता. ज्या बातमीने रेसिडेंट यांस आपथगामी केलें, ती दिवाणास कोणी सांगितली याविषयीं कामिशनास कांहीं माहिती मिळत नाहीं. * गायकवाड सरकारच्या राज्याच्या सुरक्षितपणास धोका आणणाऱ्या आणि अमदाबाद जिल्ह्यांत आणि आसपासच्या इंग्रज सरकारच्या आश्रयाखालच्या संस्थानास उपद्रव होणाऱ्या बखेड्यांचा कमिशनापुढे असा निर्णय झाला कीं, ठाकूर लोकांपैकीं एक व कोळी लोकांपैकी एक मनुष्य देखील दंगा करण्याच्या हेतूने गांव सोडून गेला नव्हता. मग हजार कोळी एकत्र होऊन साबरमतीचे त्यांनी कांठावर मजबूत जागेचा आश्रय केल्याची तर वार्ताच नको. आतां कमिशन यानी त्याबद्दल सर्व दोष बडोद्याचे दिवाणावर ठेविला आहे. पण तो दिवाण कोणत्या योग्यतेचा होता, व त्याचा दिवाणगिरी करण्याचा मुख्य उद्देश काय होता, हें मागे लिहिले आहे. तेव्हां तशा मनुष्यापासून असा असमंजसपणा न होईल तर मात्र आश्चर्यकारक खरें. परंतु ठाकूर लोकांचा एक वकील, रेसिडेंट साहेब यांजकडेस तारीख ४ जुलाई सन १८७३ रोजी आला असून त्याने बडोद्याच्या दिवाणासमक्ष आपल्या कुळास कोणकोणत्या हरकती झाल्या होत्या त्याविषयीं रेसिडेंट

  • "As a matter of fact not one of the Thakoors went out into rebellion at all nor did any of their Kolee followers, the former appearing to be much astonished when questioned by the Commission on the subject, The Commission is at a loss to under- stand whence the minister obtained the erroneous information which misled the Resi- dent. " ( Baroda Blue Book No. I, Page 121. )