पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मौडचें कमिशन. ( १४१ ) महाराजानी भिऊन आपला राज्यकारभार चांगल्या रीतीने चालवावा, हा उद्देश मनांत धरून मुंबई सरकारानी वर लिहिल्याप्रमाणे महाराजांस सूचना केली असेल. कारण त्याच यादीच्या शेवटच्या कलमांत असे दर्शविले आहे की, इंग्रज सरकार हे सर्वांच्या कल्याणाकरितां कोणत्याही कारणावरून बखेडे झाले असले तरी, ते बंद करण्याच्या काम हमेष प्रयत्न करतील; पण अविचारी लोकांमध्ये तितका विचार कोठचा ! आणि अशा गूढ अभिप्रायाचे मर्म समजण्याची त्यांजमध्ये अक्कल कोठची ! दोन्ही वाक्यांची एक वाक्यता करणे, मोठ्या ज्ञात्यास देखील कठीण पडण्यासारखे आहे. पहिल्या वाक्याचा स्पष्टार्थ असा आहे कीं, तुम्ही जर अनीतीने राज्यकारभार कराल तर त्यापासून तुम्हांवर तुमच्या जीविताला घातक असे जरी संकट आले, तरी आम्ही तुम्हास साह्य करणार नाहीं, आणि दुसऱ्या वाक्यांत असे म्हणतात की, बखेडे मोडण्याकरितां मेष प्रयत्न करण्यांत येईल. अशा रीतीने दोन्ही वाक्ये परस्परांशी विरोधी असल्यामुळे संगती लावतांना फार अडचण पडते. गृहण करून भलतेच एखादे कृत्य केले आली असती. अशा प्रसंगी अविचारी लोकांनी स्पष्ट अर्थाचें असते तर फार भयंकर परिणामावर गोष्ट सारांश शिलेदार लोकांच्या नेमणुका कमी करण्यांत मल्हारराव महाराज यानी अविचार केला होताच, पण त्या लोकांच्या संबंधाने कर्नल फेर यांच्या वर्तनांत तरी सद्विचाराचा भाग तो कोणता होता? शिलेदार लोकांच्या नेमणुकी वंशपरंपरा चाल- विण्यासाठीच राबर्टच्या रिसाल्याबद्दल तीन लक्ष रुपये इंग्रज सरकारानी गायकवाडास सोडले असे त्यांच्याही मनांत भरले होते तर ते यथान्याय होते काय ? सन १८५८ च्या बंडाच्या वेळी सरदार लोकांची शिलेदार लोकांस जामीनकी दिल्याबद्दल जो त्या लोकांनी हक्क सांगितला होता तो गृहीत करून त्याबद्दलचा पुरावा घेण्याविषयीं कर्नल फेर यानों कमिशनास शिफारस केली होती यांत त्यानी योग्य विचार केला होता काय ? फार कशाला कमिशनापुढे जितक्या लोकांनी फिर्यादी केल्या त्यांपैकी एका तरी फिर्यादीचा दावा कर्नल फेर यांस खोटा वाटला काय ? नाहीं. मग महाराजांचे आणि त्यांचे सूत्र जमून उभयतांच्या एक विचाराने राज्यकारभारांत सुधारणूक करण्यास मार्ग तरी कोणता उरला होता? सारांश कर्नल फेर यांच्या दोषप्रचूर गैरसमजुतीबद्दल जितके लिहावे तितके थोडे आहे यास्तव विशेष पाल्हाळ न करितां आलाप विमुखता स्वीकारावी हेच बरे. विजापूर परगण्यांतील ठाकूर लोकांच्या फिर्यादीबद्दल. गायकवाड सरकारच्या राज्यांत भयंकर बखेडे होऊं लागले आहेत, आणि तेणेंकरून अमदाबाद जिल्ह्याच्या व त्याच्या आसपास इंग्रज सरकारच्या आश्रयाखालीं जे मुलूख आहेत, त्यांच्या स्वस्थतेचा भंग होण्याची चिन्हें दिसतात, असे कर्नल फेर यानी मुंबई सरकारास निश्चयपूर्वक निवेदन केलें होतें, त्यास विजापूर परगण्यांतील ठाकूर