पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १४० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्यांचा होते. मल्हारराव महाराज यांच्या जीविताविषयीं, पदवीविषय आणि राज्याविषयीं मुंबई सरकार किती गतादर झालें होतें तें आतां विस्तारे करून सांगण्याचे कांहीं प्रयोजनच राहत नाहीं. त्यांच्या या उदासीनपणापासून मल्हारराव महाराज यांच्या जीविताचा अपहार करण्याविषयी कोणी प्रयत्न केला नाहीं हेंच बरे झाले. मल्हारराव महाराज यांजकडून पुष्कळ लोकांस उपद्रव झाला होता. कित्येक तर त्यांजपासून आपले मनोरथ पूर्ण झाले नाहींत इतक्याच कारणाने महाराजांचे शत्रु बनून बसले होते. विनाकारण द्वेष करणारे असे अविचारी लोक त्यांच्या राज्यांत पुष्कळ खंडेराव महाराज यांच्या कृपेतील मंडळी व त्यांचे संबंधी लोक तर महाराजांच्या उच्छेदाची संधी कशी साधेल याविषयीं डोळ्यांत तेल घालून टपत बसले होते. ज्याच्या मांडीवर मस्तक ठेवून महाराजानी स्वस्थ घोरत झोप घ्यावी, ते त्यांचे सरदार त्यांजवर विनाकारण असंतुष्ट होऊन त्यांच्या राज्यकारभारावर रेसिडेंट साहेब यानी जी बदनामी आणिली होती ती अधिक जड करण्याकरितां महाराज त्यांच्या नेमणुका देत असतां त्या न घेतां दुसऱ्यांचा उगीच कैवार घेऊन भांडत बसले होते. अशा संकटाच्या वेळेस एखाद्या अपराध्यास राज्यरक्षणबहिष्कृत करितात त्याप्रमाणें मुंबई सरकार यानी मल्हारराव महाराज यांस केलें होतें. महाराज यांच्या शत्रूस असें समजले असते कीं, मुंबई सरकारानी त्यांच्या बद्दल अगदी उदासीनता स्वीकारिली आहे. [ लोकांस तसे कळणे शक्य होते; कारण दरबारांत काय खटपट चालते याविषयी कर्नल फेर यांचे हेर बातमी ठेवीत होते असे त्यांच्याच लेखावरून दिसून आले असून महाराजांच्या विरुद्ध पक्षाच्या लोकांस रेसिडेंन्सीमध्ये येण्याची तर सदर परवानगी होती तर चार अविचारी लोक जमून काही अनर्थापात केला असता. ( मागील पृष्ठावरून. ) लागेल अशा म्हणण्याची तुमची ती याद हुकुमासाठीं सरकारांत पाठविल्यावरून, कौन्सिलांत नेक नामदार गवरनर साहेब आपल्यास कळविण्यासाठी मला फर्मावितात कीं, मागें या संबंधानें कित्येक वेळां उभय सरकारांमध्ये स्पष्टीकरण झाले असून, तुमचो राज्यकारभार चालविण्याची स्थिति आम- च्या संबंधानें कशीही गैरमान्य असली अथवा देशाचे हित करण्यास आपण कितीही थोडें मन दाखविलें तरी आपणास व आपल्या पदवीस व आपल्या राज्यास इंग्रज सरकारानें राखिलेच पाहिजे असा जो आपला भरवसा आहे ती केवळ भ्रांती आहे असे सरकारास वाटतें. ३. यासाठीं कौन्सलांत नेक नामदार गव्हरनर साहेब हे स्पष्टपणें आपल्यास कळविण्यास मला असे फर्मावितात कीं, इंग्रज सरकार व गायकवाड सरकार यांमध्ये एकमेकांस साह्य करण्याचा निकट संबंध आहे. तेव्हां मनोत्साहें हे आमच्या विचाराशी वागून संरक्षणकरत्या अधिकारास भूषणास्पद होईल अशी राज्यकारभार करण्याची रीत चालविल्यास मात्र आमच्या मदतीवर व संरक्षणावर आपण दावा करू शकाल. ४. आणखी आपणास कळविण्यांत येतें कीं, इंग्रज सरकार हे सर्वांचे कल्याणाकरितां कोणत्याही कारणावरून बखेडे झाले असले तरी ते बंद करण्याच्या कामों हमेषा प्रयत्न करतील. जुलम व गैरशिस्त राज्यकारभार यापासून अशा तन्हेचे बखेडे उद्भवतात, व तशा जुलुमावर व गैरशिस्त राज्यकारभारावरील नजर मात्र निःसंशय करून फिरविली जाणार नाहीं. सही इंग्रजी, रेसिडेंट.