पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचे कमिशन. (१३९) प्रकरण इतक्या निकरावर आलेही नसतें. नाना साहेब खानवेलकर याणी सरसकट सर्व लोकांस सालीना तीनशे रुपये पेन्शन देण्याचा ठराव केला तेव्हां दरबारांतील मुत्सदी लोकांनी त्याबद्दल त्यांस निषेध करून जुन्या लोकांचे हक्क कायम ठेवण्याविषयी त्यांचे मन वळविलें होते, परंतु निटोप्यावर गोष्ट येते न येते तोच रेसिडेंटाकडेस एक निनांवी अर्जी धाडण्यांत आली, आणि सरदार लोक जामिनकीचा हक्क सांगूं लागले, व रेसिडेंट साहेब याणी त्यांचा पक्ष घेतला, ह्या सर्व कारणांमुळे हें काम वानराच्या क्षताप्रमाणे एकदां चिरडीस गेले ते पुनः ठिकाण आणितां आले नाहीं. आतां कर्नल फेर यांच्या संबंधाने विचार करितां त्यांच्याकडून देखील या कामांत मोठ्या चुका झाल्या आहेत. सरदार व शिलेदार लोकांस त्यानीं वाजवीपेक्षां ज्यास्त आणि गैर मार्गाने आश्रय दिल्यामुळे ते लोक महाराजांचे प्रतिपक्षी होऊन बसले. त्यांस असे वाटलें कीं, आपल्या इच्छेप्रमाणे महाराजांपासून आपले मनोरथ साधून घेण्याचे आपल्या मध्ये सामर्थ्य आहे, आणि आपण महाराजांचा अतिक्रम केला किंवा केली तर रेसिडेंट साहेब आपल्या बाजूस असल्यामुळे महाराजांच्याने आपले काही पारिपत्य करवणार नाहीं. अशा अडचणीच्या प्रसंगी मुंबई सरकाराकडून सहजरीत्या एक मोठा अविचार झाला होता. सुदैवें करून त्यापासून कांहीं वाईट गोष्ट झाली नाहीं हें बरें झालें नाहीं तर अविचारी लोकांस एक प्रकारची फूस दिल्यासारखे झाले होते. मल्हारराव महाराज यानीं शिलेदार लोकांच्या प्रकरणाबद्दल रेसिडेंट यांस लिहिलेल्या यादींत असे लिहिलें होतें की, 'जर त्यांनी मला इजा दिली, तर इंग्रज सरकारास मदत करावी लागेल.' याबद्दल मुंबई सरकारानी रेसिडेंट साहेब यांचे द्वारे महाराजांस असें कळविले की, ' तुमची राज्यकारभार चालविण्याची स्थिति आमच्या संबंधाने कशीही गैरमान्य असली अथवा देशाचे हित करण्यास आपण कितीही थोडे मन दाखविलें तरी आपणास व आपल्या पदवीस व आपल्या राज्यास इंग्रज सरकाराने राखलेच पाहिजे, असा जो आपला भरंवसा आहे, ती केवळ भ्रांति आहे, असे सरकारास वाटते.' *

ही पुढे दिलेली यादी ब्ल्युबुकांत दाखल केलेली नाहीं, परंतु ती आमच्या जवळ असल्यामुळे ती आम्ही दिली आहे. मुंबई सरकारच्या ज्या खलित्याच्या आधारें ही यादी लिहिली आहे तें पत्र ब्ल्युबुक नं० १ पान १३ ह्यांत दिले असून त्या पत्राच्या ३ कलमांत मुंबई सरकारने यादींतील मजकुराप्रमाणेंच मजकूर लिहिला आहे. महाराज, बडोदा रेसिडेन्सी - ता० २९ जुलाई १८७३. लष्करी व इतर लोकांत नाराजी उत्पन्न झाली असल्याविशीं बोलणें झालें त्याबद्दल आपण आपल्या नंबर १३४७ ता० १३ जून सन १८७३ च्या यादीत असे ह्मणतां कीं, "जर त्यांनी मला इजा दिली तर इंग्रज सरकारास मदत करावी लागेल.' " २. जर तुमच्या लोकांनी तुम्हास इजा दिली तर इंग्रज सरकारास तुम्हास मदत करावी ( पुढे चाल . )