पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १३८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सांगूं दिला तर एकाद्या प्रसंगी ते कांहीं दुसरा हक्क सांगून त्याबद्दल जामीनगिरीसाठी हट्ट धरून बसतील, आणि त्यायोगाने मोठा अनर्थ उद्भवेल, परंतु आमच्या कर्नल फेर साहेब यांजमध्ये तसा कांहीं लांबचा विचार नव्हता. मल्हारराव महाराज यांजवर कोणी कशी तरी फिर्यादी आणावी येवढाच त्यांचा मतलब होता. या प्रकरणाचा उपसंहार करितांना निःपक्षपाताने आणि बेमुरखत एक दोन गोष्टी आणखी सांगण्याजोग्या राहिल्या आहेत. वरील एकंदर निरूपणावरून कोणास सहज असे वाटेल की, मल्हारराव महाराज यांच्या कृत्यास त्यांच्या पूर्वजांचें साधर्म्य आणून ते दोषभागू नाहींत असे प्रतिपादन करण्याचा माझा हेतु आहे, परंतु तसा मुळींच माझा उद्देश नाहीं. महाराज यांजक- जे अन्याय झाले आहेत ते स्पष्टपणे उल्लेखीत केल्याची अनेक प्रमाणे या ग्रंथांत सांपडतील. या शिलेदार लोकांच्या नेमणुकी कमी करण्यांत देखील त्यांजकडून जो अन्याय झाला होता तसा त्यांच्या पूर्वजांकडून कधीही झाला नव्हता असे आमचे म्हणणे आहे. परंतु तो सर्व प्रकार अगदीं निराळा आहे. त्याजबद्दल एक शब्दही कमिशनपुढे निघाला नाहीं, हा प्रकार कोणता हें पुढील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईल. नव्या राजाने माजी राजाच्या कृपेतील मंडळीस फाटे देऊन त्यांच्या जागी आपल्या कृपेंतील मंडळीस नेमण्याची तर परंपरा चालत आलेली आहे त्याबद्दल मल्हारराव महाराज यांजकड़े कांहीं दोष लागू होतो असें कबूल करवत नाहीं. राजा सर टी. माधवराव साहेब या मल्हारराव महाराज यांच्या मंडळीस ज्या नेमणुका करून दिल्या आहेत त्याप्रमाणे खंडेराव महाराज यांच्या मंडळीस मल्हारराव महाराज याण करून द्यावयाच्या होत्या अशी आशा करणे व्यर्थ होय. मल्हारराव महाराज जर विचारी आणि शहाणा राजा असता तर त्यानी आपल्या कृपेतील मंडळीस राजद्रव्यांतून ने कांहीं दिलें असतें तें आज राजा सर टी. माधवराव साहेब मल्हारराव महाराज यांच्या मंडळीस देत आहेत तसा न्यायीपणा आणि सद्विचार मल्हारराव महाराज यांच्या ठाई कोठून असणार. तस्मात हे प्रमाण घेऊन मल्हारराव महाराज यांचे कृत्य न्यायाचे किंवा अन्यायाचे ठरविणें हें कांहीं उचित नाहीं. त्यांचे पूर्वज काय करीत आले हे पाहिले पाहिजे, आणि तशा रीतीने पाहिलें असतां मल्हारराव महाराज यांजवर खंडेराव महाराज यांच्या मंडळीच्या संबंधाने कांहीं विशेष दोष लागू नसून कमिशन याणी नेमणूक कमी केल्याचे मध्य प्रमाण काढून त्यांजवर जो दोष स्थापन केला आहे त्यांत कांही अर्थ नाहीं. पण या वर्गांत जे लोक फार वर्षांचे जुने नौकर होते त्यांच्या नेमणुका कमी करून सरसकट सर्वांस सालीना तीनशे रुपयांची पेन्शने करून दिली होती. यांत मात्र मल्हारराव महाराज याणी मोठा अन्याय केला होता. त्यांच्या पूर्वजांनी असा अन्याय कधी केला नव्हता. आतां हा सर्व दोष त्या विवेकशून्य दिवाणाचा होता. मल्हारराव महाराज यांच्या मनांत जुन्या शिलेदार लोकांविषयीं कांही द्वेषभाव नव्हता, व त्यानी दिवाणास जुन्या लोकांविषयीं असे करण्यास सांगितलेंही नव्हतें, सरदार लोकांनी शिलेदार लोकांच्या तर्फे मध्यस्ती करून सौम्योपायाने महाराजांस विनंती केली असती तर हैं