पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मीडचें कमिशन. ( १३७ ) कर्नल फेर साहेब यांची जर अशी समजूत होईल की, खंडेराव महाराज यानीं सन १८५८ च्या सालच्या बंडाच्या धामधुमीत सरदार व शिलेदार लोकांचा वंशपरंपरेच्या चाकरीचा हक्क मंजूर केला आहे तर ते लोक मल्हारराव महाराज यांजपासून तो हक्क दृढ करून घेण्यासाठी कमिशनापुढे फिर्यादी करण्यास कां बरें मागे सरतील ! कर्नल फेर यानी या लोकांच्या मुकदम्यासंबंधी शेवटची हकीगत कळवितांना स्पष्ट असे म्हटले आहे की, बंडाच्या वेळेस माजी गायकवाडानीं त्यांची चाकरी वंशपरंपरेची आहे असे दृढ केले आहे असे मला समजलें होतें. * गायकवाड सरकारच्या लष्करापैकीं जो उत्तम भाग तो इंग्रज सरकारच्या तैनातीस आहे. हे तीन हजार स्वारांचे लष्कर जितक्या चांगल्या स्थितीत ठेवितां येईल तितक्या चांगल्या स्थितीत ठेविण्याविषयीं गायकवाड सरकार पराकाष्ठेचे तत्पर असून त्या लष्करा- विषयीं देखील इंग्रज सरकारचें हमेष असें गाहाणे आहे कीं, ते लोक कुच कामाचे नाहींत तर मग बाकी जे अगदीं गाबाळ राहिलें त्याजमध्ये सर्व गुजराय देशाची शांतता नष्ट करण्याचे सामर्थ्य आले कोठून ? बडोदे सरकारचे पहिल्या प्रतीचे सरदार मीर कमालुदीन हुसेनखान याणीं कमिश- नापुढे हकीकत सांगितली त्यांत त्याणी असे कथन केले होते की, सन १८५७ मध्ये सर्व सरदारांनीं खंडेराव महाराज यांस असे कळविलें कीं, आमची हत्यारे जुनी असून अगदी निरुपयोगी आहेत, आणि चांगल्या शस्त्रावांचून आमच्याने लढाई व्हावयाची नाहीं. बडोद्याच्या राजमंडपाचे आम्ही स्तंभ असा जे दावा सांगतात त्यांणी आणिबाणीच्या प्रसंगी आमची हत्यारे जुनीं आणि निरुपयोगी आहेत अशी आपल्या धन्याजवळ रड सांगितली, आणि तेच असे म्हणतात की, शिलेदार लोकांच्या आग्रहावरून खंडेराव महाराज याण आम्हास जामीन दिलें आहे, तेव्हां यांत तथ्यपणा किती आहे, आणि अशा लोकांपासून सर्व गुजराय देशाची नासाडी होईल असा दंगा काय तो होणार होता ! सिंहाच्या प्रसादाने अजा गजमस्तकावर अरोहण करिते तदन्याय ब्रिटिश सरकार- च्या आश्रयानें हे सरदार लोक मत्त होऊन पाहिजेल तसें कमिशनापुढें बकले होते. बाकी त्यांजवर मल्हारराव महाराज याणी कांहीं देखील जुलूम केला नव्हता, व त्यांच्यांत दंगाधोपा करण्याचे सामर्थ्य नसून त्यांचा इरादाही तसा नव्हता. एकादा दूरदर्शी रोसेडेंट असता तर सरदार लोकांस जामिनकीच्या संबंधाने त्यानें एक शब्द देखील बोलू दिला नसता. त्यानें असा विचार केला असता की, कोणत्या वेळेस काय प्रसंग येईल याचा नेम नाहीं. आज सरदार लोकांस असा खोटा हक्क

  • “ All I knew was * * * * that the permanent character of this service was ratified to them by the last Gackwar, at the timo of mutiny." ( Baroda Blue book No. I. Page 268.)

"The Sardars represented that the arms were old and useless and that without good arms they could not fight. " ( Blue book No. I. Page 225. ) १८.