पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १३६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- अधिकाराच्या नात्याने गायकवाड यांजपासून लेखी खुलासा मागणें हें कर्नल फेर यांचे कृत्य अगदीं असमंजस होय. अशा प्रकारच्या त्यांच्या वर्तनापासून रेसिडेंट आणि गायकवाड यांजमध्ये मनःपूर्वक रहस्य कधीही होणार नाहीं. प्रकरण मल्हारराव महाराज यांचे संबंधाने गवरनर जनरल आणि मुंबईचे गवरनर यांचे विचारांत पराकाष्ठेचें अंतर होते. कर्नल फेर एका अप्रसिद्ध वर्तमानपत्रांतील मजकु- रावर भरंवसा ठेवून गायकवाडापाशीं खुलासा मागतो काय आणि आपण हिंदुस्थान सरकारापर्यंत लांबवितों काय याबद्दल मुंबई सरकारच्या मनांत कांहीं देखील वागले नाही. कर्नल फेर याणी ता० २३ सप्टेंबर सन १८७३ रोजी दरबारांत याद लिहिली, आणि ता० २४ रोजी मुंबई सरकारास रिपोर्ट केला. गायकवाड सरका- रच्या उत्तराची वाट देखील पाहिली नाहीं, आणि मुंबई सरकारानींही त्याबद्दल गायक- चाड सरकारचें म्हणणें काय याची अपेक्षा न करितां इंडिया सरकारापर्यंत गिल्ला केला. याप्रमाणे सर फिलीप उडहौस यांच्या कारकीर्दीत मल्हारराव महाराज यांस केवळ असल्या गुणानेंच नाहीं, पण दुसऱ्या अनेक प्रकारच्या अडचणीनीं गुजराय देशासारख्या सुपीक आणि विपुल संपत्तीयुक्त देशाचे राज्य केवळ दुःखरूप झालें होतें. दुसरी एक महत्वाची गोष्ट येथे सांगितली पाहिजे. मल्हारराव महाराज याणी वाईट रीतीने राज्यकारभार चालविल्याबद्दल फिर्याद झाल्यावरून त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी कमिशन नेमले असून व्यक्तीच्या फिर्यादी ऐकून त्यांस दाद देण्यासाठी नेमले नाहीं असें जर लोकांस स्पष्टपणे कळविले असते तर कमिशनच्या तंबूपुढे फक्त मल्हार - राव महाराज यांचा राज्यकारभार वाईट रीतीचा आहे असा पुरावा करण्यासाठीच लोकांचे थवेच्या थवे चोहींकडून एकत्र झाले असते काय ? कधीही एकत्र झाले नसते. मुंबई सरकारानीं हिंदुस्थान सरकारास एका पत्रांत असें लिहिलें आहे कीं, फिर्यादी लोकांस कांहीं लालूच दाखविल्यावांचून ते कधींही कमिशनापुढे फिर्याद करण्यास धजणार नाहीत. " गवरनर जनरलच्या अनुमतावांचून कमिशन यांनी बडोद्याच्या राज्यांत एक जाहिर- नामा प्रसिद्ध केला, आणि तो गवरनर जनरल यांस सक्त शिफारस करून कायम ठेवविला, त्यामुळे लोकांची अशी समजूत झाली की, आमच्या फिर्यादी ऐकून दाद देण्यासाठीच हें कमिशन नेमले आहे, आणि त्यांत रेसिडेंट साहेब यानी त्या लोकांवि- षयीं अयोग्य रीतीची करुणा दाखविली होती, यामुळे त्या लोकांस अपेक्षितार्थ्यांच्या सफलतेविषयीं विशेष आशा उत्पन्न झाली होती. प्रबळ राजाकडून अशा प्रकारचे अभय मिळाल्यावर ज्याच्या राज्यांत फिर्याद करण्यास कोणी पुढे येणार नाहीं असा न्यायी राजा कोण असेल तो असो.

  • "But if complainants of the former class are to be told that they must look for redress to the Durbar, and that they will be, as it were, left to their mercy, we can not expect them to incur the risk of substantiating their cases before the Commission; and the inevitable result of its failure for want of evidence will be the perpetuation and aggravation of the existing evils. " (Baroda Blue Book No. I. Page 52.)