पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर रिचर्ड मोडचें कमिशन. (१३५) कोणी कांहीं लिहिलें म्हणजे पुरे. त्याजवर पूर्ण भरंवसा ठेवून 'मी एक मोठी मह त्वाची गोष्ट महाराजांच्या ध्यानावर आणितों' येथून आरंभ करून दरबारांत यादी लिहावयाची आणि त्याबद्दल वादविवाद करीत बसावयाचे इतके ते टवाळखोर लोकांच्या अधीन झाले होते. 66 याविषयीं पुष्कळ प्रमाणे आहेत त्यांतील एकच ठळक प्रमाणाचा येथें उल्लेख केल असतां, योग्य स्थळीं त्याचा उपयोग केला असें होईल. 'हितेच्छु " नांवाच्या एका देशी वर्तमानपत्रांत महाराजांविषयीं कांहीं वाईट मजकूर लिहिला होता. ते पत्र कोणी रेसिडेंट साहेब यांजकडे पाठविलें होते, व तें त्याणी दरबारांत पाठवून त्यांत लिहिलेल्या दोषांचे निराकरण करावे म्हणून यादी पाठविली होती, आणि तीत बराच कठोर शब्दांचा उपयोग केला होता. गणपतराव महाराज यांचे कारकीर्दीत एका वर्तमानपत्रांत त्यांची निंदा केली होती म्हणून त्याणी रेसिडेंट साहेब यांचे द्वारे नामदार गवरनर जनरल यांस अशी विनंती केली होती कीं, त्या वर्तमानपत्रकर्त्यास शिक्षा करावी. त्याचे जबाबांत नामदार सरकारानी त्यांस असें कळविलें होतें कीं, हलके वर्तमानपत्रकर्ते राणी साहेब यांजविषयी सुद्धां वाईट लिहितात. यासाठीं त्याबद्दल महाराजानीं आपणास वाईट वाटू देऊं नये, आणि पक्का भरंवसा ठेवावा की, अशा वर्तमानपत्रांतील मजकुरावर हिंदुरयान सरकार कधीही भरवसा ठेवणार नाहींत. या यादीचा आधार घेऊन दरबारांतून रेसिडेंट साहेब यांस खरपूस उत्तर पाठविलें त्यांत असें लिहिलें होतें कीं, या वर्तमानपत्रावरून तुम्ही महाराज यांजपासून खुलासा माग - विला त्यांत महाराजांची बेअदबी केली इतकेंच नाहीं, पण नेक नामदार गवरनर जनरल साहेब बहादूर यांच्या हुकुमाचाही अपमान केलात. गायकवाड सरकाराकडून उत्तर येण्यापूर्वीच रेसिडेंट साहेब याणी मुंबई सरकारांत याबद्दल पत्रव्यवहार केला होता, व त्याणीही ते प्रकरण इंडिया सरकाराकडे पाठविलें होते. * त्यांच्या जबाबांत इंडिया सरकारानी नंबर २६०९ ता० २९ आक्टोबर सन १८७३ चे पत्र मुंबई सरकारास पाठविलें, त्याचे तिसरे कलमांत त्याणी कर्नल फेर यांच्या वर्तनावर सक्त टीका * केली आहे त्यांतील भावार्थ असा आहे की, नामदार गवरनर जनरल साहेब यांस या संबंधी कर्नल फेर यांचे आचरण अगदी पसंत नाहीं. अप्रसिद्ध अशा नोटव वर्तमानपत्रांतील मजकूर कितीही खरा असो, परंतु त्याबद्दल

  • "With reference to the immediate subject of your letter, His excellency the Viceroy and Governor General in Council regrets that he cannot approve of the action taken by the Resident in the case. Whatever truth there may be in the alle- gations, it was, in the opinion of His Excellency in Council an injudicious proceeding on the Resident's part to demand from the Gaek war officially and in writing an expla- nation of statement made in a copy of an obscure native newspaper, which was sent to him anonymously. Such a course was not calculated to lead to a cordial understand- ing between the Resident and the Gaekwar. " (Baroda Blue Book No. I. Page 49.)