पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दिले. त्यांत लष्करी लोकांच्या वर्गाला जो शेरा लिहिला आहे त्यांत मुख्य सरदार लोक देखील या वर्गात आले आहेत असे लिहिले असून, त्या सर्वांचा साडे तीन वर्षांचा पगार चढलेला आहे असे लिहिले आहे, आणि त्यांस पगार न दिल्यामुळे त्यांचें फार नुकसान झाले असे कथन केले आहे. पण सरदार लोकांनी कमिशनापुढे साफ कबूल केले आहे की, आमचा दोन वर्षांचा पगार आम्ही होऊन घेतला नाहीं, तेव्हां त्यांचा साडे तीन वर्षांचा पगार दरबाराकडे घेणे आहे, ह्या कर्नल फेर ह्यांच्या म्हणण्यास प्रमाण काय ? आणि भलतीच अट धरून पगार न घेतल्मामुळे त्यांचे जे कांही नुकसान झाले असेल, त्याबद्दल मल्हारराव महाराज यांजकडे दोष कोणता ? सामान्य शिपायांप्रमाणे सरदार लोकांस पेन्शन देणे चांगले नाही असा मी महारा- जांस उपदेश केला असे त्यानी मुंबई सरकारास रिपोर्ट केले त्या संबंधाने सरदार लोकांच्या फिर्यादीत एक शब्दही नाहीं. होते, पण सरदार लोकांस पेन्शने करून देण्याचे महाराजांच्या मनांत कधीही आले नव्हतें, व सरदार लोकांसही तसे वाटले नव्हते, मग त्या विषयावर महाराजांचे आणि रेसिडेंट साहेब यांचे भाषण होण्याचे प्रयोजन काय, व महाराजांस त्या संबंधाने उपदेश करण्याची रेसिडेंट साहेब यांस अवश्यकता कशाने उत्पन्न झाली तें कांही समजत नाहीं. लष्करी लोकांच्या मनामध्ये असमाधान उत्पन्न झाल्यामुळे त्या लोकांपासून मोठा दंगा होईल या कर्नल फेर यांच्या भविष्य कथनास प्रमाण काय ? एका निनांवी अर्जीत " या जुलुमाचा काय परिणाम होईल तें सांगवत नाहीं, " असे लिहिले होतें तेंच का या भविष्य कथनास प्रमाण ! आणि त्या प्रमाणावर गायकवाडांच्या राज्यांत भयंकर बखेडे होऊं लागले आहेत, आणि तेणेंकरून गायकवाडांच्या मुलुखाचीच नाहीं, पण त्या मुलुखाच्या सरहद्दीवरील मुलुखाची देखील स्वस्थता भंग होऊं पहात आहे असे गवरनर जनरल यांच्या मनांत भरवून त्यांचे मन विटवावयाचें ! तुम्ही कांहीं दंगा करण्याच्या विचारांत होता की काय ? याबद्दल कमिशनानी सरदार व शिलेदार यांस कांही विचारले नाहीं. पण रेसिडेंट साहेब याणी आपण केलेले भविष्य कथन तरी कां खरें करूं दिले नाहीं ? महाराजानी लष्करी लोकांचा मागील पगार देण्याचे कबूल केल्यामुळे वीस हजार पासून तीस हजार लोकांच्या मनांत घातुक असमाधान उत्पन्न होऊन जो दंगा होणार आहे तो टळेल, हे कर्नल फेर यांचे निवेदन अंशतः तरी खरें कां ? ज्याच्या लेखावर अतिशयोक्तीच्या अंशाचा देखील अक्षेप घेता येऊं नये त्याच्या लेखा- च्या सत्यपणाविषयी शंका घ्यावी लागते याबद्दल खरोखर फार वाईट वाटतें. राजद्रोही लोकांवर वाजवीपेक्षां ज्यास्त विश्वास ठेविला आणि एकच बाजू पाहिली ह्मणजे त्या मनुष्यापासून अशा चुका व्हावयाच्याच मग तो स्वतः कितीका पवित्र मनाचा असेना. भाऊ पुणेकर वगैरे कर्नल फेर यांच्या भरंवशाच्या मंडळीनी कर्नल फेर यांजवर खूप पगडा बसविला होता यांत काही संशय नाहीं. मल्हारराव महाराज यांचा राज्यकारभार वाईट असल्यामुळे कर्नल फेर यांचे मनः त्यांजविषयी फारच विटले होते. महाराजांच्या विरुद्ध कोरे कागदावर काळ्या शाईने