पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन. ( १३३ ) झाल्याविषयों मला कळविण्यांत आले आहे, ' असा जो मजकूर आहे त्याचा संबंध जसा बिजापुरच्या ठाकूर लोकांकडेस लागतो तसाच या लष्करी लोकांच्या वर्गाकडेसहा लागतो. कमिशन साफ म्हणाले होतें कीं, व्यक्तीच्या फिर्यादी ऐकण्याचा मुळीच उद्देश नाहीं असे असतां रेसिडेंट साहेब याणी सरदार लोकांस आपल्या तर्फे कोणता पुरावा करण्यासाठी कमिशनापुढें साक्ष देण्यासाठी नेलें तें कांही समजत नाहीं. वाईट राज्यव्यवस्थेपासून देशाची स्वस्थता नष्ट होऊं पहात आहे असे रेसिडेंट याणी केलेले दृढकयन सरदार लोकांच्या साक्षीवरून शाबीत झाले काय ? सरदार लोकांवर मल्हारराव महाराज याणी असा कोणता जुलूम केला होता की, त्या योगाने सरदार लोक हातांत नागव्या तरवारी घेऊन हरहर महादेव म्हणून लढण्यास उभे राहिले होते ? आणि त्यामुळे देशाची धुळधाणी होत होती किंवा होणार होती? शिलेदार लोकांचा कैवार घेऊन ते विकत श्राद्ध घेऊन उगीच सव्य अपसव्य करीत बसले होते. त्यांत त्याणी किती असमंज- सपणा केला होता याबद्दल वर लिहिलेच आहे. कर्नल फेर यांच्या स्वतःच्या लेखावरूनच दिसते की, कमिशनापुढे साक्ष देण्याक रितां सरदार लोक रेसिडेंट यांच्या बंगल्यांत एकत्र झाले त्यापूर्वी त्यांपैकी एक दोन सरदार खेरीज करून त्यांची व रेसिडेंट साहेब यांची कर्धीही मुलाकत झाली नव्हती, व त्यांच्या फिर्यादी काय होत्या हें रेसिडेंट साहेब यांस माहित नव्हते. *

कर्नल फेर यांस सरदार लोकांच्या फिर्यादीच काय आहेत हे जर माहित नव्हते तर त्याणी कमिशनापुढे त्यांस कशासाठी नेलें ? अगोदर त्यांच्या फिर्यादी काय आहेत हे ऐकून घ्यावयाचे. नंतर त्या वाजवी आहेत किंवा नाहींत याचा विचार करावयाचा, आणि त्यानंतर त्या लोकांच्या असमाधानापासून देशाची शांतता नष्ट होण्याची शक्यता आहे की काय किंवा त्यांच्या मनांत कांहीं दंगाधोपा करावयाचे आहे की काय याचा शोध करा- वयाचा व त्याविषयी आपले मन काय साक्ष देते याचा विचार करून मग त्यांस कमि- शनापुढे आपल्या तर्फे साक्षीदार म्हणून उभे करावयाचें. त्यापैकी तर कर्नल फेर याण कांहीएक केले नाहीं, मग त्यांस कसे समजले होते की, सरदार लोकांवर महाराजानी अन्या- याचा जुलूम केल्यामुळे त्यांची मने अस्वस्थ झाली होतीं ? बरें त्यांची मनें अस्वस्य झालीं होती असे त्यांस बातमी देणारांनी सांगितले होते, पण त्यापासून देशाची अस्वस्थता नष्ट होणें शक्य होते की काय याचा विचार केल्यावांचून मुंबई सरकारास तसे कळविणे कर्नल फेर यांस उचित होते काय ? त्यानी या लोकांच्या संबंधाने निरनिराळ्या वेळी विसंगत हकीकत सांगितली आहे. कमिशनच्या कामास सुरुवात होण्यापूर्वी त्यानी कमिशनास एक पत्रक तयार करून “ I deem it necessary to bring to the notice of the Commission that until the morning of the 10th instant, when their proceedings commenced I had never seen more than two of the principal Sardars to converse with, and I did not know what the personal complaints of even those were. ' (Baroda Blue Book No 1 Page 268.) "