पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. सावळी आणि खैराळू हे परगणे आमचे जहागिरीचे आहेत, अशी कमिशनापुढे खोटी फिर्याद करून काय लाभ मिळविला ? उलटे आपण बेइमानी आणि राजद्रोही आहोत असें मात्र लोकांत म्हणवून घेतले. सारांश ज्या लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी सरदार लोकांस कमिशनापुढे फिर्याद करण्याची व खोटे दावे उपस्थित करण्याची सला देऊन उत्तेजन दिले त्यांनी त्यांचा पराकाष्टेचा घात केला असे आह्मी समजतों. कारण राजद्रोह केल्यामुळे सरदार लोकांच्या कपाळाला जी काळिमा लागली आहे, ती वज्रलेप झाली आहे. आतां या लोकांच्या संबंधाने कर्नल फेर यांच्या वर्तनाविषयी थोडासा विचार कर्तव्य आहे. सर रिचर्ड मीड साहेब याणी कमिशनच्या कामास सुरुवात होण्यापूर्वी कर्नल फेर यांस त्यांनी कोणते मुकदमे कमिशनापुढे आणावे याबद्दल ता० १ नोवेंबर सन १८७३ रोजी पत्र लिहिले आहे, त्यांतील चौथ्या कलमांत लिहिले होतें. * या कलमांत नामदार गवरनर जनरल यांच्या मुख्य उद्देशास अणुरेणु इतकाही फरक पडूं नये अशी रेसिडेंट यांस मर्यादा घालून दिली होती. कमिशन म्हणतात की, व्यक्तीच्या फिर्यादी ऐकण्याचा मुळींच उद्देश नाहीं. गायकवाडांच्या वाईट राज्यकारभारापासून देशाचे सुरक्षितप- णास आणि ब्रिटिश सरकार आणि गायकवाड सरकार यांजमध्यें स्थापित झालेल्या संबंधास धोका येत आहे असा जो आरोप आणिला आहे तो खरा किंवा खोटा आहे असे ज्यावरून स्थापित होईल तशा फिर्यादी मात्र कमिशनापुढे रेसिडेंट याणी आणिल्या पाहिजेत. ब्रिटिश सरकार आणि गायकवाड सरकार यांजमध्ये जो संबंध स्थापित झालेला आहे त्यास धोका बसत आहे असा कर्नल फेर याणी मल्हारराव महाराज यांच्या राज्यका- रभारावर जो आरोप आणिला होता त्याचा निकाल कमिशनापुढे काय झाला हे पूर्वी कळविलेच आहे. आतां वाईट राज्यकारभारापासून देशाचे सुरक्षितपणास धोका येत आहे असा जो दुसरा आरोप होता त्याविषयी आपण विचार करीत आहोत. लष्करी लोकांच्या मनाम- ध्ये असमाधान उत्पन्न झाले असून त्यापासून देशाच्या सुरक्षितपणास धोका येत आहे असे रेसिडेंट याणी दृढकथन केल्यावरून नेक नामदार गवरनर जनरल याणी मल्हार- राव महाराज यांस कमिशन नेमण्याची काय जरूर पडली याबद्दल खलिता लिहिला त्यांत 'देशाच्या शांततेस धोका येईल अशा रीतीने तुमच्या प्रजेमध्ये असमाधान उत्पन्न

“ In respect of the second class of cases, the object in view in not the in- tended redress of individual grievances but the establishment or otherwise of a suffi. cient number of instances of grave oppression or misgovernment to enable the Com- mission to form an opinion as to the existence, as alleged, of such general mal-admi- nistration on the part of the Gaekwar Government as to imperil the peace of the country, and to affect the existing relations between His Highness and the British Go- vernment, and none but cases of a sufficiently serious character to bear clearly on the pbject of this branch of the inquiry should, we consider, be laid before us for investi. gation, " (See roda Blu book No. 1 Page Commission Report.)