पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचे कमिशन कमी करणे जरूर होते किंवा नाही हे पाहण्याचे कांहींच प्रयोजन नाहीं. हक्क होता किंवा नाहीं इतक्याच पुरतें मागील वहिवाटीवर लक्ष देऊन पाहिले म्हणजे मल्हारराव महाराज यांजकडे कांहीं दोष लागू होतो असे दिसत नाही. सरदार लोकांच्या फिर्यादीबद्दल कमिशनानीं जो अभिप्राय दिला तो वर लिहिला असून त्यावरून त्यांस मल्हारराव महाराज यांजकडून कांहीं उपद्रव झाला नव्हता असे स्पष्ट आहे. त्यांचा दोन वर्षांचा पगार त्यानीं होऊन घेतला नव्हता, व त्याबद्दल जी निमित्ते सांगितली होती ती अगदी खोटीं होतीं. खंडेराव महाराज यानी सन १८५८च्या सालांत कपुराई मुक्कामी आम्हांकडून शिलेदार लोकांच्या नेमणुकीबद्दल जामिनकी करविली आहे, असे जे त्यांचे म्हणणे होते त्यास कांहीं प्रमाण नसून ते पराकाष्ठेचें असमंजसपणाचे होते. ज्या वेळेस इंग्रज सरकारावर भयंकर प्रसंग गुदरला होता आणि खंडेराव महाराज मित्रभाव स्मरून त्यांस कायावाचा मने करून आणि राष्ट्राची सर्व संपत्ति आणि बळ खर्च करून अगदी पवित्र मनाने साह्य करण्यास तत्पर झाले होते, त्या वेळेस आमच्या नेमणुकीच्या शाश्वती विषयों आम्हांस खात्री द्या," अशी शिलेदार लोकांनी अद धरल्यावरून खंडेराव महाराज यानीं निमूटपणे सरदार लोकांकडून त्यांची खात्री करविली होती, असे वदणेंच पराकाष्टेचे लज्जास्पद आणि बेइमानीपणाचे दिसते. आणीबाणीच्या प्रसंगी चाकर लोकांनी भलतीच अट करून मागितली असतां ते किती उग्र शासनास पात्र होतात ही गोष्ट मनांत आणिली असतां शिलेदार लोकांच्या मुखांतून 'आम्हांस आमच्या नेमणुकीबद्दल जामीन द्या' हे शब्द निघाल्याबरोबर खंडेराव महाराज यानी त्या लोकांस काय शासन केले असते त्याची कल्पना देखील करवत नाहीं; कारण तो प्रसंग उपेक्षा करण्यासारिखा नव्हता. आणि शिलेदार लोक तरी असे कोठें बलाढ्य होते कीं, अट धरून राजाकडून त्यांनी आपल्या इच्छे प्रमाणे करार करून घ्यावेत ? सन १८५८च्या सालांत आम्हांकडून जामिनकी करविली असे सरदार लोक म्हणतात; आणि खंडेराव महाराज यानी तर त्याच सालांत रुपये ६,६६५, दुसरे वर्षी ६,६४९, तिसरे वर्षी ४६, ९३४, आणि चवथ्या वर्षी ५२,०५२ याप्रमाणे त्यांच्या कारकीर्दीच्या सगळ्या वर्षांत शिलेदार लोकांच्या नेमणुका कमी केल्या होत्या. सरदार लोकांकडून जामिनकी कर- विली असती तर ती पहिल्या वर्षी देखील त्यानी पाळिली नसती काय ? त्यांच्या अमलांत सरदार लोकांनी आपली जामिनकी कायम ठेविण्यासाठी कांहीं एक इलाज केला नसून मल्हारराव महाराज यांजवर त्याजबद्दल फिर्याद करण्यास कोणाच्या बळावर ते प्रवृत्त झाले ? या जामिनकीबद्दल फडणीस, शिलेदार बक्षी, आणि शिंबंदीबक्षी, यांच्या दप्तरांत कांही दाखला नसून तशी वहिवाट देखील चालली नाहीं. मग सरदार लोकांच्या म्हणण्यास प्रमाण तरी काय ? आणि कमिशनापुढे त्याबद्दल पुरावा देण्यास ते कोणत्या अधारावर तयार झाले होते. या गोष्टी मनांत घेऊन विचार करितां, त्यांच्या धाडसपणाब- द्दल, अविचाराबद्दल, आणि बेइमानीपणाबद्दल, फार नवल वाटते. नबाब साहेब मीर कमालु उद्दीन हुसेनखान यानी, आणि जमादार डोसुमिया पार्ने ।