पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन• ( १२९ ) हजार एकशे अठ्याणव रुपये कमी करण्यांत आले असून त्यांची सरासरी अडतीस हजार तीनशे नव्याणव रुपये पडते. आतां मल्हारराव महाराज यांचा या कामांत विशेष छांदिष्टपणा तो कोणता, आणि त्यांजकडे किती दोष लागू होतो या विषयीं जर निःपक्षपाताने विचार केला तर त्यानीं रेसिडेंट साहेब यांची मर्जी सांभाळली नाही हाच काय तो त्यांचा छादिष्टपणा आणि मोठा दोष असे म्हणणे भाग येतें. रेसिडेंट साहेब यांची मर्जी त्यानीं सुप्रसन्न ठेविली असती तर शिबंदीच्या खर्चांत खंडेराव महाराज यानी पराकाष्ठेचें उणीकरण केले असून त्यांजवर कर्नल फेर यानी जसे पांघरूण घातले तसे मल्हारराव महाराज यांच्या कृत्यावर देखील त्यांनी घातले असतें. रेसिडेंट साहेब यानों कमिशनची अशी समजूत केली की, जी शिबंदी चाकरीच्या उपयोगी नव्हती ती बरतर्फ करून खंडेराव महाराज यानी सन १८५८ नंतर पलटणी- च्या फौजेंत वृद्धी करून त्या फौजेस चांगल्या स्थितीस आणिले.* मल्हारराव महाराज यांचे पूर्वज यानी शिलेदार व शिबंदी या दोन्हीं खात्यांत मनास वाटेल तसे उणीकरण केले असतां त्या वेळेस त्या लोकांच्या मनामध्ये असमाधान उत्पन्न होऊन राज्यांत दंगे बखेडे कां झाले नाहीत ? आणि मल्हारराव महाराज यांच्याच कारकीर्दीत कां होऊं लागले ? खंडेराव महाराज यानी चाकरीच्या उपयोगी नाहींत असे लोक बरतर्फ केले होते, तर मल्हारराव महाराज यानी जे लोक बरतर्फ केले होते, ते तरी चाकरीच्या उपयोगी होते असे कोठें सिद्ध झाले आहे ? सारांश मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील बखेड्यांची कारणे अशीं कांहीं विलक्षण आहेत की, त्यांविषयीं स्पष्टपणे कांही बोलतां किंवा लिहितां येत नाहीं. आम्ही या प्रकारणाच्या उपोदघातांत असे लिहिले आहे कीं, शिलेदार लोकांच्या वर्गांत राजाच्या व दरबारांतील कामदारांच्या कृपेंतील लोकांचा मोठा समुदाय असतो. आणि त्यांचा वशिला नाहींसा झाला, म्हणजे त्यांच्या चाकरीचें आयुष्य संपते, अशी परंपराच चालत आली आहे. आनंदराव गायकवाड यांच्या कृपेतील मंडळीस सया- जीराव महाराज यानी; सयाजीराव महाराज यांच्या कृपेंतील मंडळीस गणपतराव महाराज यानी; गणपतराव महाराज यांच्या कृपेतील मंडळीस खंडेराव महाराज यानीं; आणि खंडेराव महाराज यांच्या कृपेतील मंडळीस मल्हारराव महाराज यानीं बरतर्फ करून त्या जागी आपल्या कृपेंतील मंडळीस दाखल केल्याची एकसारखी मालिका चालत आली आहे. या लोकांच्या चाकरीची शाश्वती कधीच नव्हती. खंडेराव महाराज यांच्या कृपेंतील मंडळीच्या नेमणुकींत अल्पीकरण केलेली रक्कम फार मोठी दिसते. “ It should also perahaps be mentioned in connection with reductions carried out by Khanderao, which were very considerable amongst the Shibandi classes, that the Resident has brought to notice that subseqnent to 1858 he largely increased his military force, aud improved its efficiency at a considerable charge, thereby rendering the continued maintenance of so large a force of Shibandis no longer necessary. " (Blue Book No. I Page 116. )