पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. लोकांच्या वर्गात लाख दीड लाख रुपयांचे उणीकरण करण्याजोगी इतकी मोठी ही खर्चाचीच बाब कोठे आहे. . दरबारानी रुजू केलेल्या यादी कामेशनानी लक्षपूर्वक अवलोकन केल्या असत्या तर राजपदांत फेरबदल झाल्यानंतर आरंभीच्या काही वर्षांत या वर्गातील लोकांच्या नेमणुकीत असेच उणीकरण होत आले आहे असे त्यांच्या ध्यानास आले असते. संवत १८७६- सन १८१९-२० या वर्षी अडुसष्ट हजार तीस आणि संवत १८७८- सन १८२१-२२ या वर्षी १,३२,०६६ एक लक्ष बत्तीस हजार सासष्ट रुपये शिलेदार लोकांच्या नेमणुकींत कमी करण्यांत आले होते. आनंदराव गायकवाड निवर्तल्यावर सयाजीराव महाराज गादीनशीन झाले त्यांच्या कारकीर्दीची ही आरंभीची वर्षे आहेत. त्यानंतर त्यानी आपल्या कारकीर्दीत कोणत्या वर्षी चाळीस हजार, को वर्षी आठ्ठेचाळीस हजार आणि कोणत्या वर्षी पांचशे आणि कोणत्या वर्षी तीनशे असे उणीकरण केले होतें. सारांश त्यांच्या कारकीर्दीच्या आरंभीच्या वर्षांत त्यानी सदहूंप्रमाणे मोठ्या रकमा शिलेदार लोकांच्या नेमणुकींतून कमी केल्या होत्या. संवत १९०६- सन १८४९-५० या वर्षी गणपतराव महाराज यानी रुपये ८३,४०० त्र्याऐशो हजार चारशे रुपये शिलेदार लोकांच्या नेमणुकींत कमी केले होते. गणपतराव महाराज यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचें हे दुसरे वर्ष. खंडेराव महाराज गादीवर बसले त्या वर्षी त्यानी शिलेदार लोकांच्या वर्गात रुपये ४१,४९४ एकेताळीस हजार चारशें चवऱ्यावण कमी केले असून कधी सुमारे बावन हजार कर्धी शेचाळीस हजार कर्धी सवीस हजार असे कमी केले होते. मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी १,७२,१९४ एक लक्ष बहा- त्तर हजार एकशे चौऱ्यावणव दुसऱ्या वर्षी १,१३,९५७ एक लक्ष तेरा हजार नऊशे सत्तावन आणि तिसऱ्या वर्षी ६७,८०४ सदुसष्ट हजार आठशे चार मिळून रुपये ३,५३,९५८ तीन लक्ष त्रेपन हजार नऊशें अठ्ठावन रुपये शिलेदार लोकांच्या खर्चांत कमी करण्यांत आले होते. त्यांत एक लक्ष त्र्याणव हजार पांचशे रुपयांची रक्कम खंडेराव महाराज यांच्या मेहेरबानीतील मंडळीच्या नेमणुकी कमी केल्याबद्दलची होती. शिबंदीच्या नेमणुकांत खंडेराव महाराज यांच्या पूर्वजांनी फारसें उणीकरण केले होते असे दिसत नाही, पण खंडेराव महाराज यानी तर मल्हारराव महाराज यांसही मागे सारले होते. संवत - या वर्षी दोन लक्ष आठ हजार चारशे अका रुपये, संवत या वर्षी एक लक्ष अडतीस हजार आठशे त्रेपन रुपये असे एकंदर १८६६/६७ त्यानी आपल्या कारकीर्दीत शिबंदीच्या खर्चात सहा लक्ष छतीस हजार पांचशे पंचाहत्तर रुपये कमी केले असून त्यांचे मध्यप्रमाण पंचेचाळीस हजार चारशे चौऱ्याशी पडतें. १९२२ १८६५/६६ १९२३ मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीच्या तीन वर्षांत या खात्यांत एक लक्ष पंधरा