पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन (१२७) करून त्यांच्या नेमणुका कमी केल्यामुळे त्यांच्या चाकरीचा अशाश्वतपण्या झाला होता तो मल्हारराव महाराज याणी छांदिष्टपणाने सरसकट त्यांच्या नेमणुकी कमी केल्याने ज्यास्त वाढला आहे असे कमिशन म्हणतात. यावरून या वर्गात असे उणिकरण होतच आले आहे असे सिद्ध होतें. आतां मल्हारराव महाराज यांजवर याबद्दल ज्यास्त दोष आणिला असून प्रथमदर्शनी तसे दिसून येतें, परंतु काळजीपूर्वक तपास करतां कमिशनापुढे दरबारानी रुजू केलेल्या पुराव्यावरून मल्हारराव महाराज यांच्या कृत्यास त्यांच्या पूर्वजांच्या कृत्यांचे पुष्कळ अंशी साध्यर्म असून कमिशनानी दिलेल्या दोषास ते पूर्णपणे पात्र नाहीत असे पुढील हकीकती- वरून आपल्यास कळून येईल. शिलेदार आणि शिबंदी या वर्गाच्या लोकांत मागील साठ वर्षात कसकसे उणीकरण होत आले त्याबद्दल दरबारांतून दोन यादी कमिशनास देण्यांत आल्या होत्या. त्यांची सरासरी करून कमिशन याणी असे स्थापित केले आहे की, मागील वर्षांच्या प्रमाणापेक्षां मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीच्या चार वर्षांचें मध्य प्रमाण फार जबर आहे. सन १८१३-१४ पासून सन १८६९-७० पर्यंत म्हणजे खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीचा शेवट होईपर्यंत एकंदर रु०१०,८४,९१३ दहा लक्ष चौऱ्याशी हजार नशे तेरा रुपये शिलेदार लोकांच्या वर्गात कमी करण्यांत आले होते. त्याची दर वर्षाची सरासरी रुपये १९,३७३ पडते, आणि खंडेराव महाराज यांची चौदा वर्षांची कारकीर्द निराळी घेऊन त्यांत या वर्गामध्ये उणीकरण झाले होतें त्याची सरासरी केली तर त्यांच्या सगळ्या कारकीर्दीत एकंदर रुपये २,६६,४०० दोन लक्ष सासष्ट हजार चारशे रुपये शिलेदार लोकांच्या वर्गात कमी झाले असून त्याची सरासरी वर्षास रुपये १९०२८ रुपये पडते, आणि मल्हारराव महाराज यांच्या चार वर्षांचे कारकीर्दीत त्यानी शिलेदार लोकांच्या वर्गात रुपये ३, ५३,९५८ तीन लक्ष त्रेपन हजार नऊशे आढावन रुपये कमी केले असून त्याचे मध्य प्रमाण रुपये १,१७,९८६ एक लक्ष सत्रा हजार नऊशे शायशी रुपये पडते. ह्यापैकी १,९३,५०० एक लक्ष श्याणव हजार पांचशे रुपये तर खंडेराव महाराज यांच्या कृपेतील व अनुयायी मंडळी- मध्ये कमी केले आहेत. यावरून प्रथम दर्शनी ठळकपणे असे दिसते की, मल्हारराव महाराज यांचे करणे विशेष छांदीष्टपणाचे होते, परंतु तसे नाहीं. दरबारांतून कमिशनची बरोबर समजूत घालण्यांत आली नसून कमिशनानीही दरबारानी रुजू केलेल्या दोन यार्दीकडे बरोबर लक्ष दिले नाही, यामुळे मल्हारराव महाराजांवर ज्यास्त दोष लागू झाला असून त्यांच्या दुर्दैवाने त्यांची कारकीर्द फारच योड्या वर्षांची असल्यामुळे मध्यप्रमाणाचा अंक ज्यास्त दिसत आहे. त्यांचे राज्य दहा पंधरा वर्षे कारकीर्दीतील मध्यप्रमाण देखील अगदर्दी कमी पडले असतें; चालले असते तर त्यांच्या कारण दर वर्षास शिलेदार