पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास बाकी राहिलेल्या २८ मोकदम्यांपैकी ११ मोकदम्यांविषयी कमिशनानी असे लिहिले आहे की, त्यांच्या फिर्यादीचे कारण माजी गायकवाड यांच्या कारकीर्दीत उपस्थित झाले होते आणि ह्या लोकांच्या फिर्यादींचा जो कांहीं थोडा संबंध प्रस्तुत कारकीर्दीशी होता त्याबद्दल त्यांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी आपल्या फिर्यादी कमिशनापुढून काढून घेतल्या. * बाकी राहिलेल्या १७ मोकदम्यांविषयी कमिशनानी तपास करून व त्याबद्दल दरबा- रचें उत्तर घेऊन आपला अभिप्राय दिला आहे. त्यांत नंबर ११, १२, १९, २०, २१, व ३०, ३५, ३७, ३८ इतक्या मोकदम्यांत मल्हारराव महाराज यांचे कृत्य कमिशनास प्रशस्त वाटले नाही, आणि बाकीच्या आठ मोकदम्यांत कमिशनानी त्याबद्दल आपला अभिप्राय द्यावा असे त्यांत कांहीं महत्व वाटले नाही. शेवटी कमिशनानीं या वर्गाचे लोकांबद्दल असे लिहिले आहे की, या लोकांच्या फिर्यादीविषयों पूर्ण विचार करितां असे दिसून येते की, पूर्वीच्या गायकवाडांनी कारणावांचून या वर्गांतील लोकांस वेळोवेळ बरतर्फ केले व त्यांच्या नेमणुका कमी केल्या होत्या, यामुळे त्यांच्या चाकरीचा अशाश्वतपणा झाला होता तो मल्हारराव महाराज यानी छांदिष्टपणाने सरसकट त्यांच्या नेमणुका कमी केल्यामुळे ज्यास्ती वाढला आहे. तशांतून ह्या वर्गां- तील इतर लोकांच्या नेमणुका कमी करण्यांत मल्हारराव महाराजांचा कांहीही हेतु असो; परंतु खंडेराव महाराजांच्या अनुयायी व आश्रित मंडळीच्या नेमणुका ह्यानीं कमी केल्या त्या संस्थानचे हिताकरतां नसून केवळ द्वेषाने व सूड उगविण्याचे हेतूने केल्या असाव्यात. असे वाटतें. + याप्रमाणे कमिशनापुढे लष्करी लोकांच्या फिर्यादींचा निकाल झाला. मल्हारराव महाराज यांच्या कृत्यांस त्यांच्या पूर्वजांच्या कृत्यांचें साधर्म्य नाहीं असे कृत्य विरळा, असे मागे लिहिले आहे त्यास कमिशनच्या लेखावरून देखील बळकटी येते. पूर्वीच्या गायकवाडांनी कारणावांचून या वर्गांतील लोकांस बडतर्फ No. III " Of the remaining 28 cases of grievances that have been preferred before the Commission, the following 11 in number- Nos. 7, 8, 9, 22, 23, 25, 29, 32, 33, 39, 40, -originated altogether in the time of the late and previous Gaikwars, and any complaints in connection therewith against the present Chief have been ad justed by him, and are withdrawn. " (Baroda Blue Book No 1 Page 111.)

+ On a full consideration of the circumstances connected with the grievances of the Sardars and military classes as already set forth, the Commission is of opinion that the uncertainty of service and the liability to summary dismissal without special cause or reason, to which these classes appear to have been subject at the hands ofr previous Gaikwars, have been seriously aggravated since the accession of the present Chief by the wholesale reduction he has carried out amongst them generally in an arbitrary manner, and as regards the followers and dependants of his predecessor rather apparently in a spirit of hate and vengence than from a feeling of State neces- sity. (Baroda Blue Book No. 1 Page 117.) ""