पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दरबारांतून देण्यांत येत नाहीं. नबाब साहेब आपल्या पदरचे मोठे सरदार म्हणून खंडेराव महाराजानी त्यांजवर मोठी मेहेरबानी केली आहे. दरवारच्या कामदारांचे म्हणणे अगदर्दी वास्तविक आहे. इस्ताव्याची मुदत संपल्या नंतर अथवा परगणा खालसा वांहेवाटीत घेतल्यावर नफ्याबद्दल इजारदाराचा दरबारावर दावा कशाचा आणि त्याबद्दल त्यास कांही रक्कम मिळण्याचा संभव काय ? कांहीं एक नाही असे असतां आपल्या धन्याचा उपकार विसरून नबाब साहेब यानी कमिशनापुढे सावळी परगणा आपली जहागीर म्हणून दावा केला. यांत त्यांनी किती असमंजसपणा केला आणि त्यांस सला देणारांनी किती पाजीपणा केला त्याविषयी जितक्या कडक शब्दांनी टीका करावी तितकी थोडीच आहे !!! याचप्रमाणे डोसूमिया म्हणून बडोद्याच्या दरबारचे जमादार आहेत. त्यांनी देखील खैराळू महाल आपली जहागीर म्हणून कमिशनापुढे फिर्यादी केली होती. सावळी परगणा जसा नबाब साहेब यांजकडेस होता, तसाच खैराळू महाल सदहू जमादार यांजकडेस होता आणि तो खंडेराव महाराज यानी खालसा वहिवाटीतीत घेतला तेव्हां जमादार यांसही दहा हजार रुपये दरसाल देण्याविषयीं ठराव केला होता, आणि ते रुपये मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीत त्यांस मिळत होते. · दरबारांतून महाराजांच्या नांवाने जमादार यांस पत्र लिहावयाचे असले म्हणजे त्यांस 'चिरंजीव' हे विशेषण लिहिण्याचा सांप्रदाय असे. महाराज या घराण्यांतील सरदारांस आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे मानीत होते, परंतु त्या अविचारी जमादारांस व त्यांस सला मसलत देणारास आपल्या धन्यावर खोटी फिर्याद करण्यास कांही देखील शरम वाटली नाहीं. याच जमादारावर खंडेराव महाराज यांचे अमलांत एक भयंकर आरोप आला होता, आणि त्याबद्दल त्यांस महाराज यानी बिड्या घालून काही वर्षे कैदेत टाकिले होतें, तथापि त्याचा सर्व सरंजाम जशाचा तसाच चालविला होता. पुढे खंडेराव महाराज यानीच त्यांस बंदमुक्त करून पूर्ववत् प्रमाणेच त्यांची सर्व व्यवस्था कायम ठेविली होती. त्या जमादाराचें मल्हारराव महाराजांविषय अविचाराचें वर्तन कोणास वाईट दिसणार नाहीं ?

  • कर्नल फेर साहेब आपणास अनुकूल आहेत, व त्यांच्या कृपेने आपल्यास जे कांही

हवें तें मिळेल असे सरदार लोक यांस वाटल्यामुळे त्यानी महाराजांवर खोट्या फिर्यादी करून आपल्या पूर्वजांच्या इमानीपणास डाग लावून घेतला. बडोद्याच्या दरबारांत मीर सर्फराजअल्ली म्हणून मोठा शहाणा सरदार होता. राज्यास कांहीं संकट पडले म्हणजे महाराज त्यांची मसलत घेत असत, आणि राजापासून कांहीं अर्थ साधून घेणे त्यांस जड वाटले, तर रेसिडेंटाच्या शिफारसीने ते आपला

  • कर्नल फेर यांच्या कर्तेतील पुष्कळ मूर्ख लोकांची आज देखील अशी समजूत आहे कीं,

ते पुनः बडोद्याचे रेसिडेंट होऊन येतील व आपले सर्व मनोरथ पूर्ण करतील.