पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. विला असेल तर नकळे; कारण सरदार लोकांनी फिर्याद करण्यास जाऊं नये असा दरबारांतून उद्योग चालू होता. कर्नल फेर यानी त्यांच्या धन्यावर आणलेले आरोप शाबीद करण्यासाठी कमिशनापुढे साक्षी देण्यास्तव सरदार लोक रेसिडेंट साहेब यांच्या बंगल्यावर गेले त्या वेळेचा त्यांचा थाटमाट आणि डामडौल मोठा विलक्षण होता. त्यांच्या स्वामीनी त्यांस जे बहुमान दिले होते त्यांसह सर्व लवाजम्यानिशी मोठ्या थाटाने ते प्रथम राजवाड्यांत आले. त्यांत कित्येकांनी तर आपल्या स्वारीचा थाट मोठा भव्य दिसावा म्हणून आपल्या स्वारी- पुढे चालण्याकरितां कांही मनुष्ये मजुरी देऊन आणिली होती. त्यांनी महाराजांस असे भय घातलें कीं, आमच्या म्हणण्याप्रमाणे जर महाराज आमचा बंदोबस्त करणार नाहीत तर आम्ही आपल्यावर कमिशनापुढे फिर्याद करूं. सरदार लोकांचे म्हणणे महाराजानी ऐकावे असे त्यांत कांही नव्हते. इंग्रज सरकारानी गायकवाड सरकारास सरदार व शिलेदार लोकांच्या नेमणुका वंशपरंपरेने चालविण्यासाठी राबर्टच्या रिसाल्याबद्दल तीन लक्ष रुपये माफ केले आहेत असे ठरवून घ्यावयाचे होतें, आणि दुसरा त्यानी असा एक हक्क सांगितला होता की, सन १८५७ च्या सालांत इंग्रज सरकारच्या पलटणी फितून मोठे बंड झाले होते त्या वेळेस शिलेदार लोकांची गरज लागली तेव्हां खंडेराव महाराज यानी आम्हाकडून त्यांस अशी जामिनगिरी करविली आहे की, सरका- रांतून त्यांच्या नेमणुकींत कांहीं कमी केले तर आम्ही मध्ये पडून तसे करूं देऊं नये. हाही हक्क त्यांस स्थापित करून घ्यावयाचा होता, आणि त्या दोन्ही गोष्टी तर मुळींच कबूल करण्यासारख्या नसल्यामुळे मल्हारराव महाराज यांजकडून त्यांस उत्तर मिळाले की, तुमची इच्छा असेल तसे करा, परंतु मला तुमचे म्हणणे कबूल नाही. तेव्हां ते रेसिडेंसीच्या बंगल्याकडेस चालते झाले. हा देखावा खरोखर मोठा भयंकर होता. जे सरदार आपणास राजमंडपाचे स्तंभ म्हणवीत होते तेच ते त्या राजमंडपास कोसळून पाडण्यास सिद्ध झाले. त्या अविचारी लोकांस आपल्या कृत्याचा भावी परिणाम कांहींच समजला नाही. लोकांस असे वाटले की, गायकवाडाची राजलक्ष्मी आतां इंग्रज लोकांच्या घरांत जाण्यास सुरुवात झाली. ज्या सरदारांनी आपल्या राज्यावर कांही संकट आले असतां त्याचे निवारण करण्यासाठी काया वाचा मने करून आणि धने करून झटावें, तेच सरदार जेव्हां राज्यावर उलटले तेव्हां लोकांस तसे वाटणे हे स्वाभाविक होतें. सरदार लोकांत प्रौढ बुद्धीचा आणि शहाणा मनुष्य कोणी उरला नव्हता. त्यांचे कारभारी आणि सलामसलत देणारे काय ते भाऊ पुणेकर आणि बळवंतराव मुनसी हे असल्यामुळे अविचाराचे कोणतेही कृत्य करणे झाल्यास त्यांत कोणतीही उणीव पडेल असे नव्हते, आणि त्यांत 'मर्कटं मंदिरा पानं ' या म्हणीप्रमाणे कर्नल फेर यांची त्यांस अनुकुलता असल्यामुळे तर त्यांचे डोळे अगदी फिरून गेले होते. आपल्या पूर्वजांनी राजनिष्टपणाने स्वामीसेवा करून कसा नांवलौकिक मिळविला, आणि त्यांचे वंशज आपण आपल्या धन्यावर कोणापुढे फिर्याद करण्यास