पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचें कमिशन. (१२१) या वर्गांत नवे लोक पुष्कळ शिरले आहेत. राजाची कृपा किंवा लहर याजवरच ते दिमाख मिरवितात; चांगली नौकरी बजाविल्याबद्दल अथवा त्यांच्या पूर्वजांच्या योग्यतेवरून ते मानास चढले आहेत असे नाही.* सरदार व शिलेदार लोकांच्या फिर्यादीचे मूळ स्वरूप काय होते याचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून त्याची परिभाषा कथन केली आहे. आतां त्या लोकांना कमिशनापुढे कोणती गान्हाणी सांगितली आणि कमिशनानीं त्यांच्या फिर्यादीबद्दल काय अभिप्राय दिले त्याविषयों निरूपण करावयाचे आहे. सर रिचर्ड मोड साहेब यांच्या मनांत प्रयम ब्रिटिश सरकारच्या रयतेवर गायकवाडा- कडून जुलूम झाल्याबद्दल जो आरोप आणिला होता त्याची चौकारी करावयाची होती, परंतु रेसिडेंट साहेब यानी प्रथम सरदार आणि शिलेदार लोकांच्या फिर्यादीबद्दल चौकशी करावी असा आग्रह धरल्यामुळे कमिशनानी प्रथम त्यांच्या फिर्यादी ऐकिल्या असे कमिशनचे सेक्रेटरी यानी ता० १८ नोवेंबर सन १८७३ रोजी हिंदुस्थान सरका रचे फारेन सेक्रेटरी यांस पत्र लिहिले आहे त्यावरून कळून येते. या पत्राचे पांचवे कलमांत असे लिहिले आहे की, सरदार आणि लष्करी लोक यांच्या फिर्यादी प्रथम ऐकाव्या असा रेसिडेंट साहेब यांचा आग्रह पडला. त्यांस असा संदेह उत्पन्न झाला की, त्या वर्गाच्या लोकांच्या फिर्यादी ऐकण्यास विलंब केला असता त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांमध्ये जे अतिशय असमाधान उत्पन्न झाले आहे त्यांजपासून कांही त्रासदायक परिणाम होईल. + सरदार व शिलेदार यांच्या अगोदर फिर्यादी न ऐकिल्यामुळे त्रासदायक परिणाम कोणता होणार होता है आपल्यास कळण्यास काही मार्ग नाहीं; कारण फर्नल फेर यांचे म्हणणे अगर्दी अस्पष्ट शब्दांनी उल्लेखित केले आहे. सूज्ञ लोकांची सल्ला घेतल्यावर कमिशनापुढे फिर्याद करण्यापासून सरदार लोक पराङ्मुख होतील, आणि पुराव्याची कमतरता पडेल असे रेसिडेंट साहेब यांस भय वाटल्यामुळे त्यानी कमिशनास बाऊ दाख- • “ There are some members of this body, whose rank, dignity, and position have been coeval with the elevation of the Gaekwar dynasty, and who, as such are en titled to special consideration; there are others who are of more or less recent growth, embracing many who have no services or pedigree to boast of, and who became what they are from mere favour or caprice. (Report on the Administration of the Baroda State for 1875-76.) + “ It was the wish of the Commission that the complaints of injustice and op- pression at the hands of the Darbar or its officials preferred by British subjects should be first taken up, but the Resident was urgent that those of the Sirdars and military elasses should have precedence as he was apprehensive that any delay in dealing with them might lead to trouble, in consequence of the serious discontent of some of these parties, and the remainder of the past week was accordingly given up to an in quiry into their grievances. " (Baroda Blue Book No. I. Page 54 Section 5. ) १६.