पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा स्वरा इतिहास. खंडेराव महाराज यानों राज्याला पुष्कळ कर्ज करून ठेविलें होतें, आणि ते मी जवाहीर विकून फेडले असून आतां लोकांस मोठ्या मोठ्या नेमणुका देऊन पुनः कर्ज करण्यास इच्छित नाहीं, वैगरे धार्मिकपणाच्या गोष्टी मल्हारराव महाराज यानीं सांगितल्या होत्या त्यांत कांही अर्थ नव्हता. स्वतः आपण किती उधळे आहोत आणि आपल्या मंडळीस किती मोठ्या नेमणुका करून देऊन राजद्रव्याचा कसा अपव्यय करीत आहो हे त्यांनी मनांत न आणतां आपली सर्व आंडी पिली जाणणाऱ्या घरभेद रेसिडेंटास वाटेल तसे लिहिले होतें. खंडेराव महाराज निवर्तले तेव्हां सुमारे ऐशी लक्ष रुपये सरकारी दुकानांत शिलक असून तेच रुपये मल्हारराव महाराज यानी मुंबईस पाठवून व्यापार केला होता. असे असतां मी जवाहीर विकून सर्व कर्ज फेडून टाकिले, असे त्यानी रेसिडेंट साहेब यांस बेलाशक सांगितले व लिहिले, तेव्हां त्यांस काय ह्मणावे ? त्या निनांवी अर्जीतील लेखाचा डौल असा होता की, लेदार लोक तितके वंश- परंपरेचे चाकर; आणि जेव्हां गायकवाड सरकारानी गुजराय देश सर करून राज्य स्थापन केले तेव्हां त्यांचे पूर्वज गायकवाडांच्या नौकरीत असून त्यांनी लढायांमध्ये मोठे शौर्य गाजविल्यावरून त्यांस मोठया पदव्या देऊन नेमणुका करून दिल्या आहेत. * राजास किंवा दिवाणास पण या वर्गातील सर्वच लोक गायकवाड सरकारचे वंशपरंपरेचे चाकर नसून गायकवाडांनीं गुजराय देश काबीन केला त्या वेळेपासून सर्वशिलेदार लोकांचे पूर्वज गायकवाड सरकारची चाकरी करीत आले होते असेही नाहीं. आपल्या कृपेतील एखाद्या मनुष्यास कांहीं शाश्वतची नेमणूक करून देऊन त्याची अब्रू वाढवावयाची असली ह्मणजे त्यांस शिलेदार करून त्याचे नांव शिलेदारांच्या पटांत घालावयाचें, अशी गायकवाडांच्या दरबारांत चाल चालत आली आहे. वशिल्याने त्या वर्गांत नवे लोक शेंकडो शिरतात, व ज्यांचा वशिला नाहीसा झाला ते कमी होतात, अशी, हाली माजी झाली म्हणजे हमेष फेरबदल होत आली आहे. राजा सर टी. माधवराव यानीं आपल्या कारकीर्दीतील बडोद्याच्या स्थितीबद्दल सन १८७५-७६ चा रिपोर्ट केला आहे त्यांत सरदार व शिलेदार लोकांविषयों यथार्थ निरूपण केले आहे. ते म्हणतात:- या वर्गांत ज्यांच्या पूर्वजांनी बहादुरीच्या नोकऱ्या करून मोठे यश मिळविले, आणि गायकवाडाचे घराणे उत्कर्षास आले तेव्हांपासून वंशपरंपरेने त्यांची चाकरी करीत आलेले असे मोठया पदवीचे व योग्यतेचे अमीर लोक असून ते विशेष कृपेला पात्र आहेत; पण त्याखेरीज • महाराज यानों राज्यसूत्र हातांत घेतल्याबरोबर सरकारी दुकानांतला सर्व ऐवज मुंबईस रवाना केला, तेव्हां त्यांस असे करण्याचा हेतु काय ह्मणून कोणी विचारिलें. त्याचें उत्तर त्यानीं असे दिलें कीं, कांही तक्रार पडून राज्य आपल्या हातांतून गेलें तर त्याबद्दल उद्योग करितांना द्रव्याचा तोटा पडूं नये ह्मणून मी तें द्रव्य इंग्रज सरकारच्या मुलुखांत पाठविलें आहे. या त्यांच्या गैर समजुतीस काय ह्मणावें ! पण इंग्रज सरकारच्या न्यायावर त्यांची फार निष्ठा होती यांत कांहीं संशय नाहीं. महाराज यांस प्रतिबंध केल्यावर महाराजांच्या जनानखान्यांतून आम्ही चाळीस लक्ष रुपये शोधून काढले असा सर लुई पेली यानों स्तोम मिरविला आहे ती रक्कम याच ऐव- जापैकों होती.