पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचें कमिशन. (११९ ) आहे की, चाकराने अमुक वर्षे चाकरी केली पाहिजे; आणि कोणी फारच महत्वाची चाकरी केली, तर त्यास मात्र त्याच्या हयातीपर्यंत अयवा एक दोन पुस्तपर्यंत कांहीं नेमणूक देतात, परंतु वंशपरंपरेची नेमणूक कर्धीही देत नाहींत. निरुपयोगी खर्च कमी करून राज्य कर्ज मुक्त करावे ही राज्यकारभार चालविण्याची रीतच आहे. लोकांस मोठ्या नेमणुका करून देऊन राज्य कर्जंत बुडवावे हे मला आवडत नाहीं. माजी महाराजांनी राज्यास फार कर्ज करून ठेविले होते, ते मी जवाहीर विकून फेडून टाकिले असून आतां मी पुन: कर्जाचा भार डोक्यावर घेण्यास इच्छित नाही. ठरावाप्रमाणे शिलेदार लोकांची पगार घेण्याची इच्छा नसेल तर त्यानों नौकरीचे राजीनामे पाठवून द्यावेत ह्मणजे जुन्या नेमणुकीप्रमाणे पगार चुकवून देईन. पण मी कांहीं त्यांस बरतर्फ करण्यास इच्छित नाही, असे असतां मला जर ते कांहीं इजा देतील तर ब्रिटिश सरकारास मदत करावी लागेल. नव्या तुम्ही पाठविलेली निनांवी अर्जी मी वाचली. त्यांत तीन लक्ष रुपये शिलेदार लोकांच्या नेमणुकी चालविण्यासाठींच इंग्रज सरकारांनी गायकवाड सरकारास माफ केले आहेत, अशा अशा खोट्या गोष्टी लिहिल्या असून तो अर्जी कोणी लिहिली हे समजत नसल्यायु के त्या अर्जीतील हकीगतीवर कांहीं विश्वास ठेवितां येत नाही.* वर लिहिलेल्या हकीकतीवरून शिलेदार लोकांच्या फिर्यादीचे सामान्य स्वरूप काय होतें, आणि त्या संबंधानें मल्हारराव महाराज आणि रेसिडेंट साहेब यांचे ह्मणणे काय होतें हें स्पष्टपणे दिसून येते. कर्नल फेर यानीं शिलेदार लोकांबरोबर सरदार लोकांसही गोवले आहेत, पण महारा- जानी रेसिडेंट साहेब यांस जें उत्तर पाठविले त्यांत फक्त शिलेदार लोकांसंबंधीच मज- कूर होता. त्यानी सरदार लोकांच्या नेमणुकी कमी केल्या नव्हत्या, व त्याबद्दल कोणी निनांवी अर्जीने देखील रेसिडेंटाकडे फिर्यादी केली नव्हती. "I spoke to you on Thursday, the 26th June, also of the reduction made of the Shiledars, and said that, as there were more than the required number of Shile- -dars, I had reduced some and allowed only & sufficient number to remain. Those that were dismissed were useless servants, and for several years passed have been drawing high allowances for services rendered by their forefathers to the state; but as I thought there was no necessity for continuing such high allowances any longer, I have reduced them and allowed the Shiledars an amount sufficient for their main. tenance. ”—“ The British Government grant pensions to those that have served them for a certain number of years, and for extraordinary services grant a good service pension either for life or for two and three lives, but never do they grant & heredi- tary pension. ”—“ I do not approve of the system of allowing high allowance to useless servants when the state is in debt. The late Maharaja left the state deeply involved, but I sold the state jewellery paid off all the out standings against the state, and do not wish to see it again in debt. If these men are unwilling to accept the reduced allowances that I allow them, they can send in their resignations, and their accounts will be settled at the old rates up to the date of their reductions. I do not wish to dismiss them. But if they should give me any trouble the British Government will have to render assistance. " ( Blue Book No. 1Page 12.)