पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचें कमिशन. (११७) कीं, राज्याचा खर्च फार वाढला असून उत्पन्न कमी झाल्यामुळे खचौत काटकसर करणे जरूर झाले असून शिलेदार लोकांचा मोठा समुदाय आहे व त्यांस कितीएक वर्षांपासून मोठ्या नेमणुका मिळत असून त्यांचा कांहींएक उपयोग नाहीं, सबब त्यांच्या नेमणुका दोन वर्षांवर कमी केल्या. आणि ही खखर त्या लोकांस त्याच वेळेस दिली होती. महाराजांच्या भाषणावर कर्नल फेर यानी उत्तर दिले त्यांतील तात्पर्य असे आहे की, महाराजानी निरुपयोगी खर्च कमी करण्याचे धारले आहे हे फार योग्य आणि कायदेशीर आहे, परंतु खर्च कमी करतांना वंशपरंपरेच्या नौकर लोकांस विपत्ति प्राप्त न होईल असे धोरण ठेवले पाहिजे. अशा बाबतींत या शतकाच्या आरंभी गायकवाड सरकारानी ब्रिटिश सरकारची सला घेऊन कोणत्या रीतीने व्यवस्था केली होती याविषयी दप्तरी पुष्कळ दाखले आहेत. मी महाराजांस आणखी असे सांगितले की, सुमारे एक हजार शिंदी लोक आणि दुसरे यांच्या मनांत असमाधान उत्पन्न होऊन महाराज त्यांस निमे पगार देतात तो घेण्यास ते नाकबूल असून भर पगार मागतात असे माझ्या ऐकण्यांत आले आहे. यासाठी माझी अशी सला आहे की, त्यांचे म्हणणे काय आहे तें उघड दरबारांत ऐकावें, आणि त्यांजपाशी ज्या सनदा असतील त्या नाकारूं नयेत, आणि कोणतीही गोष्ट करितांना हे मूळतत्व मनांत धरून ठेविले पाहिजे की, राज्यक्रांती झाली असतांही सर्व पदवच्या लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे सर्वदां संरक्षण करणे अवश्य आहे, आणि त्यांस विपद्दशा प्राप्त होऊं देऊं नये, यासाठी अशा नाजूक कामांत फार सावधगिरीने आणि उदारपणानें जें कांहीं करावयाचें तें केले पाहिजे.* १४६ ७६२ नंबर च्या पत्रांत महाराजानीं शिलेदार लोकांस त्यांच्या नेमणुकी कमी केल्याबद्दल दोन वर्षांपूर्वी कळविले होते की नाही याबद्दल कर्नल फेर यानी चौकशी केली, त्यांत काय निष्पन्न झाले ते लिहिले होतें. शिलेदार लोकांच्या नेमणुकी कमी केल्याबद्दल त्यांस लागलीच खबर दिली होती, अशी कांहीं रेसिडेंट साहेब यांची खात्री झाली नाही. महाराज असा आग्रह धरून बसले होते कीं, शिलेदार

“ I replied, ” said the Resident that His Highness' object in reducing unnecessary state expenditure was of course a very proper and legitimate one, but that it was necessary in making large and important reductions &inong hereditary servants of a state to protect present oocupants and their familics from & downfall into ob- solete ruin; that there were numbers of instances on record, showing how the Gack- war Government had managed such matter in communication with the British Go vernment during the early part of this century. I said that I had heard a good deal of late regarding the discontent of about a thousand Sindees and others who, to- gether with other Sirdars, declined to take the half pay which His Highness had offered and demanded the whole as their just due. I advised His Highness to give them all & full hearing in open Darbar, and not to repudiate any Sannds that they might have in their possession; and to bear in mind the principle that, in great changes in states, individuals of all ranks and families were always protected from personal ruin and that great caution and libarality were needed in so delicate a matter. (Blue book No. 1 Page 7 Section 5.)