पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. १४६ ३. पत्र नंबर ८ तारीख १९ आगस्ट सन १८७३ कलम २ तागाईत ७६२ कलम ८. ती मी पत्र नंबर ५५३ याच्या सहाव्या कलमांत असे लिहिले होतें कीं, राज्यांतील लष्करी लोकांपैकी काही वर्गाच्या लोकांनी एक निनांवी अर्जी मजकडे पाठविली आहे. महाराजांकडेस पाठवीन; कारण त्या अर्जीत फारा दिवसांपासून मी जो गवगवा ऐकिला आहे, त्याविषयींचे उद्गार बाहेर काढिले आहेत. याबद्दल सावधगिरी ठेवण्याविषयी मी वारंवार प्रधानास सांगितले आहे; परंतु माझ्या उपदेशाकडे ते लक्षच देत नाहीत. मला असे दिसतें कीं, दरबार दिवसानुदिवस बेपरवा होत चालले असून कोणत्याही उपायाने द्रव्यापहार करावा हा क्रम त्यानी स्वीकारिला आहे. त्यापैकीच हाही एक प्रकार आहे. * वर लिहिलेल्या निनांवी अजीतील तात्पर्य असे आहे की, शिलेदार लोक हे फार जुने नौकर असून दमाजी गायकवाड आणि पिलाजी गायकवाड यांनी गुजराय देश सर केला तेव्हां त्यांचे पूर्वज त्यांच्या चाकरीत होते, व त्यांनी लढायामध्ये मोठ्या बहादुऱ्या करून वतने आणि नेमणुका संपादन केल्या आहेत. सन १८५७ च्या सालामध्ये ब्रिटिश सरकारास देखील त्यांनी मदत केली असून त्यांच्या नेमणुका वंशपरंपरे चाल- विण्याकरितांच इंग्रज सरकारांनी गायकवाड सरकारास राबर्टच्या रिसाल्याबद्दल तीन लाख रुपयांची माफी केली आहे. हल्लीं नानासाहेब खानवेलकर यानी शिलेदार लोकांचा पट मागवून सरसकट सर्वांस दरसाल रुपये ३०० ची नेमणूक करून देण्याचा ठराव करून बाकीची नेमणूक कमी केली आहे. त्यायोगानें स्वार आणि घोडे उपाशी मरत असून त्यांस दोन वर्षांचा पगार मिळाला नाही. शिबंदीच्या बेहेडयावरील जमादार यांचा अक्त्यार काढून टाकून दरोगे नेमले आहेत. लष्करी लोकांवरील अंमलदारांपासून नानासाहेब खानवेलकर नजराणा घेतात, आणि जो नजराणा देत नाहीं त्यास कामावरून काढून टाकितात. रिसाल्यांच्या सुभेदारांस आपला हुद्दा कायम ठेविण्याकरितां सोळाशे रुपये नजराणा द्यावा लागतो. सुभेदारां पैकी कांहीं लोकांनी नजराणा देण्याकरितां सावकारांपासून कर्ज काढिले, आणि त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार झाल्यामुळे त्या दुःखाने त्यापैकी कांहीं मेले. याप्रमाणे रयतेपासून जुलमी कर घेण्यांत येतात. त्या जुलुमांचा परिणाम काय होईल हे कांही कळत नाहीं. पत्र नंबर 400 यांत लष्करी लोकांच्या संबंधाने महाराज आणि रेसिडेंट यांत बोलाचाली झाली त्याविषयी लिहिले होतें. महाराजांच्या भाषणांतील तात्पर्य असे आहे

“ I have this day the accompanying anonymous petition setting forth the grievances of certan military classes in this State. I shall forward it to His High- ness the Gaekwar, because it expresses sentiments which I have long since heard, are matters of current rumours, and upon which I have frequently spoken to the mi- uister, advising caution; but really, so far from listening to my advice, the Darbar seems to me to be fast becoming reckless in this matter of extorting money by every possible means in their power, and this unhappily is one of them. " ( Blue book No 1 page 4 Section 6, )