पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन. (११५) कमिशनानी त्यांजपुढे स्वराज्यांतील अव्यवस्थेबद्दल उया फिर्यादी झाल्या होत्या त्यांचे एकवीस वर्ग केले आहेत, त्यांपैकी जे काही फार महत्वाचे आहेत त्यांविषयीं मात्र आप- ल्यास विचार कर्तव्य आहे ते हे:-- १. सरदार व शिलेदार लोकांच्या फिर्यादी. २. बिजापूर परगण्यांतील ठाकूर लोकांच्या फिर्यादी. ३. शेतकरी लोकांच्या फिर्यादी. ४. वतनदार लोकांची वतनें जप्त केल्याबद्दलच्या फिर्यादी. ५. सावकार लोकांच्या फिर्यादी. ६. आठ मनुष्यांस फटके मारितांना त्यापैकी एक मरण पावला त्याबद्दल. ७. लोकांच्या बायका जबरीने कामास लावण्याकरितां जुलूम केल्याबद्दलच्या फिर्यादी. ८. कैलासवासी खंडेराव महाराज यांच्या कुटुंबांतील मनुष्यांवर जुलूम केल्या- बद्दलच्या फिर्यादी. ९. कैलासवासी खंडेराव महाराज यांच्या कृपेतील मंडळीवर व त्यांच्या चाकरांवर जुलूम केल्याबद्दलच्या फिर्यादी. १०. वंशपरंपरेचीं इनामें कारणावांचून जप्त केल्याबद्दलच्या फिर्यादी. ११. अमदाबादकर जव्हेरी यांचे जवाहीर खरेदी घेतले, त्याची बरोबर किंमत त्यास मिळाली नाहीं त्याबद्दल त्यांनी केलेल्या फिर्यादी. १२. माजी दिवाण गणेश सदाशिव यांच्या चिरंजीवाने त्याचे इनाम गांव जप्त के- ल्याबद्दल केलेली फिर्याद इतक्या वर्गाच्या फिर्यादी काय त्या कमीज्यास्त प्रमाणाने महत्वाच्या आहेत यासाठी त्याविषय क्रमाने आतां आपण विचार करूं. सरदार व शिलेदार लोकांच्या फिर्यादी. कर्नल फेर यानों मल्हारराव महाराज यांच्या वाईट राज्यकारभाराबद्दल मुंबई सरकारास पत्रे लिहिली. त्यांत या लोकांच्या संबंधाने खाली लिहिलेल्या पत्रांत हकीकत आहे. १. पत्र नंबर ५५३ तारीख २५ जून सन १८७३ कलम ६. या पत्राबरोबर एका निनावी अर्जीचे भाषांतर जोडले होतें. १०७ २. पत्र नंबर 40 तारीख २८ जून सन १८७३ कलम ३ तागाईत कलम ६.