पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. काय झाला हे आम्ही वर लिहिले आहे त्यावरून या प्रकरणांत कर्नल फेर यांचा पुरावा कमिशनापुढे लटका पडला इतकेच नाहीं, परंतु त्याणी जे दृढकथन केले होते ते गैर समजुतीचे होते असे ठरलें, गायकवाड सरकारच्या राज्यकाभारांतील अव्यवस्थेमुळे इंग्रज सरकारच्या हितास आणि तहनाम्याअन्वयें स्थापित झालेल्या त्यांच्या हक्कास अपाय होत आहे असे, कर्नल फेर यांच्या रिपोर्टावर भरंवसा ठेवून मुंबई सरकारानी हिंदुस्थान सरकारास कळविले होते त्यापैकी काही देखील खरे झाले नाहीं. जो अपराध गायक- वाडांकडून झाला नव्हता त्याबद्दल त्यांजवर आरोप आणण्यांत कर्नल फेर यांजकडून पराका ष्ठेचा मर्यादातिक्रम झाला असतां त्या वर्तनाबद्दल कमिशनच्या रिपोर्टात एक शब्द देखील नाहीं, व त्याचप्रमाणे मुंबई सरकारानी कमिशनच्या रिपोर्टावर अभिप्राय दिला त्यांत देखील कांही लिहिलेले नाहीं. टक्कर साहेब याणी आपल्या मिनिटांत तर कर्नल फेर यांची पराकाष्ठेची स्तुति केली आहे. हिंदुस्थान सरकारच्या एका पत्रांत मात्र असे लिहिले आहे की हें कमिशन नेमण्याचा हेतु जसा समाधानकारक झाला पाहिजे होता तसा झाला नाही. कमिशन नेमण्याचा प्रधान हेतु निष्फळ झाला, व कर्नल फेर यानी मल्हारराव महाराज यांजवर इंग्रज सरकाराबरोबर केलेले कौल करार मोडल्याबद्दल व त्यांच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दल जे आरोप आणिले होते ते कमिशनापुढे लटके पडले हैं सोपपत्तीपूर्वक सांगितले आहे. हे आरोप आणण्यांत कर्नल फेर यांची इतकी गैर सम- जूत झाली होती की, त्यानी बुद्धीपुरस्कर महाराजांवर खोटे आरोप आणिले होते असे देखील कोणी म्हणू शकेल. आतां आपल्यास कमिशन नेमण्याच्या गौण हेतूंचा कमिशनापुढे काय परिणाम झाला हे पहावयाचे आहे. महाराजांचा राज्यकारभार फार वाईट प्रकारचा होता, त्यामुळे लोकांची मनें फार उद्विग्न झाली होती, आणि काही वर्गाचे लोक उघडपणे राज्याविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त झाले होते, आणि तेणेंकरून गायकवाड सरकारच्या सरहद्दीवरील इंग्रज सरकारच्या व त्यांच्या आश्रयाखालच्या संस्थानिकांच्या मुलुखास उपद्रव होण्याचा रंग दिसत होता असे कर्नल फेर यानी निश्चयपूर्वक मुंबई सरकारास कळविले होतें, व त्यानीही त्यांच्या लेखावर पूर्ण भरंवसा ठेवून गवरनर जनरल यांस तसे लिहिले होतें. त्या गोष्टी खऱ्या होत्या की काय याबद्दलची चौकशी करणे हा कमिशन नेमण्याच्या गौण हेतूंपैकी एक हेतु होता हे पूर्वी निवेदन केले आहे. वाईट राज्यकारभारामुळे प्रजेची मनें उद्विग्न झाली होती है कांही नाकबूल करव णार नाहीं, पण सर्व लोकांच्या मनांत महाराजांविषयों एकसारखा तिरस्कार उत्पन्न झाला होता की काय? आणि प्रजेपैकी काही लोक अतिशय क्रोधास चढून महाराजांच्या राज्यावर बंड करण्यास प्रवृत्त झाले होते की काय ? व प्रवृत्त झाले होते तर त्यांजवर तशा निकरावर येण्याजोगा जुलूम झाला होता की काय ? हे मुख्यत्वेकरून पहा- वयाचे आहे.