पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. रेवाकाठा आणि महिकाठा इलाख्यांतील लोकांच्या दाव्यांबद्दल पोलिटिकल एजंट वाजवीपेक्षां ज्यास्त मध्यस्ती करितात यामुळे विशेषेकरून तक्रारी वाढल्या आहेत. दुसऱ्या ठिकाणी असले वाद तोडण्याचे काम केवळ देशी राज्याच्या न्यायावर टाकिले आहे. तेथे इंग्रज सरकार कांहीं दरम्यानगिरी करीत नाहींत. गुजराथ देशांतच अशी कांहीं निराळी रीत चालू आहे किंवा काय की जिच्या योगानें गायकवाड सरकाराबरोबर चांगला संबंध ठेविण्यास ज्यास्त कठीण झाले आहे, त्याविषयों कमिशनास माहिती नाहीं; परंतु ज्याजकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असा मुख्य विचार यांत हाच आहे कीं, ज्या हक्काच्या खरेपणाविषयों निश्चय झाला नाही अशाबद्दल पोलिटिकल एजंट याणी वारंवार मध्यस्ती करणे नेटिव दरबाराच्या रागास हमेश कारण होईल, आणि तेणेंकरून मित्राचाराचा संबंध ठेविणे जरी निदान अशक्य झाले नाहीं तरी अतिशय दुर्घट होईल. या वर्गांतले मुकदमे पाहण्यास आम्हांस संधी मिळाली नाही यामुळे याबद्दल गायकवाडावर जो आरोप आणिला आहे त्याबद्दल आमच्याने अभिप्राय देववत नाहीं, या कमिशनच्या म्हणण्यांत कांही अर्थ नाहीं. कमिशन नेमण्याच्या प्रधान हेतूंपैकी हा एक हेतु असत मुकदमे तपासण्याची आम्हास फुरसत मिळाली नाहीं ह्मणजे काय? त्या लेखाचा खरा अर्थ हाच कीं, त्याबद्दल रेसिडेंट साहेब यांजपाशीं कांहीं देखील प्रमाणच नव्हते तेव्हां आम्ही तपास तरी कशाचा करावा. याबद्दल रेसिडेंट साहेब यांजजवळ पुरावा असता तर त्यानी कमिशनास कां टाळाटाळ करू दिली असती. असो, या संबंधाने कमिशनर यांचा अभिप्राय खरोखर अति प्रशंसेस पात्र आहे. गायकवाड सरकार जर तहनाम्या- ^ प्रमाणे वागत नाहीत तर ज्यांचा बडोद्याच्या दरबाराशी संबंध आहे ते ब्रिटिश अधिकारी करितात तरी काय ? हे कमिशनचे म्हणणे अगदीं वास्तविक आहे. कर्नल फेर याणीं जो आरोप आणिला तोच पायाशुद्ध नव्हता. तहनाम्याला सोडून गायकवाड सरकार बागतात अशी जर पोलिटिकल एजंट याणीं अगर रेसिडेंटानी मुंबई सरकारची खात्री केली असती तर गायकवाड सरकारचा दुराग्रह एक घंटकाभर तरी त्याणी चालू दिला असता काय ? नाही, परंतु तसा प्रकार मुळींच नव्हता. गायकवाडाच्या दरबारांत ज्यांनी या संबंधी काम केले आहे त्यांस असा अनुभव आहे की, पोलिटिकल एजंट हमेष आपल्या ताब्यांतील संस्थानिकांचा व त्यांच्या रयतेचा क्षुल्लक दाव्याबद्दल पक्ष घेऊन गायकवाड सरकारास हमेष मनस्वी त्रास देतात, आणि कर्नल फेर यांच्या पूर्वी जे रेसिडेंट होते ते गायकवाडाचा अभिमान धरीत असत तरी बहुत करून प्रत्येक प्रकरणांत गायकवाड सरकारचें अनहित हमेष होत असे, आणि त्याचे कारण हेच होतें कीं, दरबारांतून त्याबद्दल ज्या रीतीनें यत्न करावयाचा त्याप्रमाणे करण्यांत येत नसे. दृष्टीने पाहिले असतां कर्नल फेर साहेब याणी बडोद्याच्या राष्ट्राचे आपण हितेच्छु असा जो बाणा बाळगला होता त्या नात्याने महाराजांवर व त्यांचे कामदारांवर असा आरोप आणावयाचा होता की, राष्ट्राचे हक्क सांभाळणे हे त्यांचे कर्तव्यकर्म असतां त्या काम त्यांचे अति दुर्लक्ष आहे, आणि त्यामुळे भोंवतालचे लहान लहान संस्थानिक देखील पोलिटिकल एजंटच्या हिमायतीने गायकवाड सरकारचे हक्क व जमिनी हिसकून घेतात, न्याय-