पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वरिष्ठांनी अलक्ष केले किंवा त्याच्या कृत्यास आपले अनुमोदन दिले, तर देशी राजांनी तो जुलूम निमुटपणे सोसला पाहिजे आणि त्यांतून मुक्त होण्याचा त्याजपाशी कांहीं देखील इलाज उरलेला नाहीं !!! गायकवाड सरकारांनी ब्रिटिश सरकाराबरोबर केलेले कौलकरार मोडल्याबद्दलच्या आरोपांची चौकशी. आतों कमिशन नेमिण्याच्या गायकवाड प्रधान हेतूंपैकी दुसरा हेतु इंग्रज सरकाराबरोबर सरकारांनी केलेले कौलकरार मोडल्याबद्दल आहे. या दोषारोपाचा कमिशनापुढे काय निकाल झाला, याविषयों निरूपण करून नंतर बडोद्याच्या आंतील राज्यकारभारांत अव्यवस्था असल्याबद्दल जे दोष आणिले होते त्याविषयों कमिशनानी काय निर्णय केला तें सांगावयाचे आहे. कर्नल फेर यानों नंबर ५७७ तारीख २८ जून सन १८७३ रोजी मुंबई सरकारास रिपोर्ट केला, त्यांत या प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यापैकी जरूरी पुरती वाक्ये टिपेंत लिहून त्यांतील भावार्थ येथे सांगितला पाहिजे, म्हणजे मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारावर या संबंधी आरोप करण्यांत किती गैरसमजूत झाली होती, ते स्पष्ट निदर्शनास येईल. सदहू रिपोर्टाच्या सातव्या कलमांत त्यांनी असे लिहिले होते की, * गायकवाडाच्या राज्यांत जो घोटाळा झाला त्याचे कारण असे आहे की, पूर्वी गायकवाडास दाबांत ठेविण्यासाठी त्यांच्या राज्याचा लगाम आपल्या हातांत आपण सार्वभौम राजे या नात्याने धरला होता तो आपण सोडून दिल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की, गायकवाडास आपण स्वतंत्र राजे आहोत असे वाटले आणि त्यामुळे गैर कायदेशीर रीतीने त्यानी आपल्या प्रजेवर अन्यायाने जुलूम केले. ग्रायकवाडास दाबांत ठेविण्यासाठी इंग्रज सरकारांनी त्यांस कसे लगामी घरले होते •याविषयी कर्नल फेर साहेब यानी आठव्या कलमांत लिहिले होतें. सन १८२०चे सालांत सयाजीराव महाराज यांस राज्याचा कुलअधिकार देतांना सर माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टन साहेब बहादूर मुंबई इलाख्याचे मोठे नामांकित माजी गवरनर यानी इंग्रज सरकारचा संबंध कोणत्या कामाशी राहिल्याबद्दल सयाजीराव महाराज यांस सूचना केल्या ती कलमें कर्नल फेर यानी आपल्या लेखास प्रमाणभूत घेतली होती त्यांतील भावार्य असा की, --

  • "In endeavouring to account for the present unsatisfactory state of affairs

generally, it has caused mc deep regret to discover how completely all that for- merly constituted the reins by which the Imperial power checked and guided the Gaikwar's own state have been let go, the result being the inordinate ideas which the Gaikwar entertains of his independent sovereignty, and the lawless practices into which he has consequently fallen towards his own subjects. ( See Blue Book No. I Page 7.)