पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन कर्नल फेर यांच्या सूचनेवरून सुरतचे असिस्टंट माजिस्त्रेट ओव् पार्शी ब्रिटिश सरकारची प्रजा आहे की काय याबद्दल चौकशी केली, परंतु पार्शी याने आपण इंग्रज सरकारची प्रजा आहो असे शाबीत करून दिले नाही. ( १०३ )” झाल्या नसता त्या पार्शी स्वतः कमिशनापुढे हजीर झाला नाही, त्याने आपण इंग्रज सरकारची प्रजा आहो असे सुरतेच्या माजिस्टापुढे शाबीत करून दिले नाहीं, ज्या पुराव्यावरून कर्नल फेर यानी दृढकथन केलें तो पुरावा त्यानी कमिशनापुढे रुजू करून गायकवाडचे कामदार लांच घेण्याकरितां अन्यायाचा जुलूम करितात असे दाखवून दिले नाही. याप्रमाणे कर्नल फेर यानी निश्चयपूर्वक सांगितलेल्या गोष्ट संबंधाने त्यांच्या मनांत जे कांहीं भरले होतें तें होतेंच. आपण सरकारास कळविले काय !! आणि कमिशनापुढे निदर्शनास येते काय !! इंडिया सरकारचा कमिशन नेमिण्याचा प्रधान हेतु काय आणि कमिशनापुढे त्याचा परिणाम होतो काय !! याबद्दल त्यास कांही वाटलेच नाहीं. पार्शी यानें खोटी हकीकत सांगून आपली कैदेतून सुटका करून घेतली होती व तो ब्रिटिश सरकारची प्रजा नव्हता. कमिश- नापुढे तो जर हजर झाला असता तर त्या सोनाराप्रमाणे कमिशनानी त्यास गायकवाडाच्या स्वाधीन केले असते आणि त्यानी त्यास कैदेत टाकिलें असतें पारशाचे कमिशनापुढे हजीर न होण्याचे कारण असतां कर्नल फेर यानी त्याचे हजीर न होण्याचे कारण फार चमत्कारिक लिहिले आहे. ते असे की, * फिर्यादी याने गेल्या आगस्ट महिन्यांत मजपुढे फिर्याद केल्यानंतर त्यानें जें वर्तन केले आहे त्यावरून असे दिसते कीं, आपला मुकदमा मोठ्या तत्परतेनें चालविण्याविषयी आरंभी त्याजमध्ये जो आवेश होता तो लयास गेला; यावरून असा संशय उत्पन्न होतो की, या कामांत न्याय होऊं नये असे कांहीं कृत्य करण्यांत आले असावे. वरील लेखांतील गर्भित अर्थ उघड हा आहे कीं, कमिशनापुढे हजर होऊन पार्शी यानें आपले काम चालवूं नये असे कांहीं गायकवाडानी कारस्थान केले झाला नाहीं. म्हणून तो हजर कमि- कर्नल फेर यांची आरोपांत आरोप आणण्याची ही एक दुसरी तन्हा होती. लोकांस फिर्यादी करण्यास उत्तेजन येईल असे दरबाराशी वर्तन करावे, ज्या गोष्टी खऱ्या आहेत अशी खात्री नाहीं त्या बेलाशक खऱ्या म्हणून आपल्या सरकारास कळवाव्या, शनापुढे त्या सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, आणि त्यांत आपण निष्फळ झालो म्हणजे गायकवाडानी कांहीं तरी कारस्थान करून फिर्यादीस कमिशनापुढे येऊं दिले नाही असा उलटा गायकवाडावरच आरोप अणावा. हे ब्रिटिश रेसिडेंटाचे कृत्य या देशांतील राज्याच्या दरबारांत बेधडक चालावयाचे कारण ते पडले अगदी बलहीन, व रेसिडेंट पडला ब्रिटिश सरकारचा नौकर. त्याने केलेल्या अन्यायाकडेस जर त्याच्या "But the conduct of the complainant, subsequent to his statement before me in Angust last, appears to be so unsatisfactory as to suggest doubts whether his original intention of prosecuting his case with vigour, has not been influenced in a manner calculated to defeat the ends of justice. " ( Scc Blue Book No. 1 Page 167)