पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. भाग ८. राणी साहेब जमनाबाई यांचे कापांत गमन-त्यांच्या प्रसूतीचा परिणाम-त्यांचे पुण्यास प्रयाण - त्यांच्यासाठी मुंबई सरकारानी महाराजांस केलेल्या शिफारशीची निष्फलता भाग ९. मल्हारराव महाराज यानी आपल्यास राज्याभिषेक करून घेतला त्याबद्दल संक्षिप्त हकीकत - बळवंतराव राहुरकर यांस नायब दिवाण नेमलें- बळवंतराव देव यांचा दरवारांत प्रवेश वरिष्ट कोर्टाची स्थापना- कामाकाजांच्या व्यवस्था–गोपाळराव मैराळ यांचा मृत्यु व त्यांच्या घराण्याची संक्षिप्त हकीकत .. .. .. .. 4. भाग १०. कर्नल बार साहेब यांचें युरोपांत प्रयाण-कर्नल शार्ट साहेब यांची त्यांच्या जाग्यावर नेमणूक-भाऊ शिंदे यांचा तुरुंगांत मृत्यु - त्यांस विषप्रयोग करून मारल्याचा मल्हारराव महाराज यांजवर मुंबई सरकारास संशय- हबीबुल्ला मुनसी याची प्रतिबंधांतून सुटका-बळवंतराव राहुरकर याच्या उत्कर्षाची कमाल-गोविंदजी नाईक याचा तीव्र पातने- पासून मृत्यु - बळवंतराव राहुरकर याचा निःपात करण्याविषयीं त्याच्या शत्रूंची कारस्थाने आणि त्यांत त्यांची सफलता-बळवंतरा- ब याजवर महाराजांची इतराजी आणि त्याच्या द्रव्याचा अपहार- बळवंतराव यांचा सत्तादीप मालवल्यावर दरबारांत घोटाळा-महारा- ज स्वतः कारभार पाहू लागल्यामुळे दुष्ट लोकांस कैकांची घरे बुडविण्यास उत्तेजन–नानासाहेब खानवेलकर यांची दिवाणगिरीवर नेमणूक-लार्ड नार्थब्रूक यांच्या दरबारास न जाण्याविषयी महारा- नांचा दुराग्रह-त्याबद्दल कामगार मंडळीच्या उपदेशाची निष्फल- ता-दादाभाई नवरोजी यांजवर महाराजांची श्रद्धा-महाराजांच्या पूर्वजांस जो मान मिळत होता तो महाराजांस दिला नाहीं याबद्द- ल गुणदोष विचार- प्रिन्स आफ वेल्स यांच्या आरोग्याबद्दल बडो- द्याच्या दरबारांतील महोत्साह-मल्हारराव महाराज याणी मुंबई सर कारच्या स्वाधीन एक लक्ष रुपये केले होते त्या संबंधाने मुंबई सरकारचा परम स्तुत्य विचार — अशी प्रकरणे या भागांत आहेत भाग ११. मल्हारराव महाराज यांचे राज्य विलयास नेण्याची सामग्री-कर्नल बार साहेब यांचा मृत्यु – कर्नल फेर यांची रेसिडेन्सीच्या हुद्यावर नेमणूक- रेसिडेंट साहेब यानी राजाशी कसे वागावे त्याबद्दल सर माउंट पृष्ठे. ३८-४० ४१-४७ ४८-६५