पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तिसरा मुकदमा बापूजी करसदजी पार्शी याजबद्दलचा होता. फिर्यादीच कमि- शनापुढे हजीर झाला नाही यामुळे त्याबद्दल चौकशी झाली नाहीं. या कामांत कर्नल फेर यानी महाराजांवर फार सक्ती केली होती. तारीख १९ सप्तंबर सन १८७३ च्या यादीचे ता० ७ आक्टोबर १८७३ पर्यंत महाराजांकडून उत्तर आले नाही, म्हणून चोवीस तासांत उत्तर पाठविण्याची कर्नल फेर यानी महाराजांस ताकीद केली होती, आणि त्याप्रमाणे उत्तर पाठविले नाही, तर मुंबई सरकारांत लिहून हुकूम मागविण्याची धमकी दिली होती व याच कामानिमित्य नवसरीच्या सुभ्यास कामावरून दूर करविले होतें कर्नल फेर यांच्या दृष्टीने मल्हारराव महाराज यांची योग्यता एखाद्या अल्प अधिकाराच्या कामदारापेक्षां ज्यास्त नव्हती. कर्नल फेर यानी तारीख १८ आगस्ट सन १८७३ नंबर १८४४ चा मुंबई सरका राम रिपोर्ट केला, त्यांतील पांचव्या कलमांत बापु करसदजी याजवर नवसरीच्या सुभ्यान कशासाठी जुलूम केला याबद्दल चमत्कारिक रीतीने दृढकथन केले होते. * नवसरीच्या अधिकाऱ्यांनी पार्शी यास धरून कैदेत टाकिले, आणि त्यास मार दिला, याचे कारण दुसरे कांही एक नाहीं; पुराव्यावरून असे दिसते की, त्याने आपल्या बायकोबद्दल दिवाणी कोटींत फिर्याद केली होती त्याबद्दल त्याजपाशी लांच मागितला तो त्यानें दिला नाहीं, सबब त्याजवर असा जुलूम केला असे सदरील पांचवे कलमांत कर्नल फेर यानी बेधडक म्हटले होते. कर्नल फेर यांच्या रिपोर्टातील सदरील अर्थाचें वाक्य मुदाम टिपेत लिहिले आहे, असे करण्याचा हेतु असा आहे की, त्याजविषयों जे. कांहीं लिहिले आहे ते साधारण आहे असे लोकांस कळून यावे. } कर्नल फेर यानी सदहूप्रमाणे दृढकथन केले त्याजबद्दल त्यांजपाशी काय पुरावा असेल तो असो. कमिशनापुढे त्यानी कांही तो पुरावा रुजू केला नसून दरबारांत- ही पाठविला नव्हता. • मजपाशी लांच मागितला तो मी दिला नाहीं सबब मला पकडून कैदेत टाकिले आणि सक्त मार दिला' असे फिर्यादीचें म्हणणे कर्नल फेर यांजखेरीज दुसऱ्या कोणासही मुळींच मान्य होण्यासारखे नव्हते. लांच देण्याबद्दल सरकारचे अधिकारी फिर्यादीवर जुलूम करितात हे म्हणणे अगदी विसंगत दिसते. लांच देणे आणि घेणे ही गोष्ट लांच देणाराच्या आणि घेणाराच्या खुषानेच घडते. जबरीने कोणी लांच मागत नाही, आणि देणार देत नाहीं. जी गोष्ट गुप्त राहावी असा दोन्ही पक्षकारांचा हेतु असतो, ती जगांत उघड व्हावी असे कृत्य कोणी कसे करील, ही गोष्ट सामान्य प्रतीच्या मनुष्याच्या देखील ध्यानांत येण्यासारखी आहे, परंतु मल्हारराव महाराजांच्या दरबारांतील ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटास त्या पारशाने जे काही सांगितलें तें त्यानी खरें मानून त्याप्रमाणे बेलाशक मुंबई सरकारास लिहिले. "The third case is one in which a Parsee, who claims to be a British subject of the Surat Zilla, has been seized and imprisoned and severely beaten by the Gaik. war officials at Naossari, for no reason that appears in evidence, except that he refus- ed to pay the Vahiwatdar of Naossari a bribe in a civil suit about his wife." (See Blue Book No. I Page 20.)