पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचे कमिशन (१०१) प्रधान हेतूं पैकी एका हेतूचे कमिशनापुढे याप्रमाणे निराकरण झाले ही खरोखर मोठी संतोषाची गोष्ट झाली. हा आरोप सिद्ध झाला असता तर या संबंधाने गवरनर जनरल यांचा विचार वेगळाच होता असे त्यांनी कमिशनास केलेल्या सूचनेवरून दिसते. आप- ल्या प्रजेच्या सुरक्षितपणासाठी गायकवाड सरकारच्या सत्तेस आणि प्रतिष्ठेस हानीकारक अशी कांहीं नवीन योजना इंडिया सरकारानी केली असती यांत कांहीं संशय नाहीं, परंतु इंग्रज सरकारच्या प्रजेवर जुलूम केल्यापासून काय परिणाम होईल याविषयी मल्हार- राव महाराज यांस कांहीं अज्ञान नव्हतें. कर्नल फेर यानी जीं तीन प्रकरणे मुंबई सरकारापर्यंत आणि त्यानी इंडिया सरकारापर्यंत नेली होती, त्यांचा कमिशनापुढे जो निर्णय झाला तो संक्षेपेंकरून येथे लिहिला असतां ती प्रकरणे किती निर्जीव होती याविषयी चांगली माहिती होईल. महिकाठा इलाख्यांतील नथवा टिसला चांभार याजविषयी कमिशन यानी अभिप्राय दिला त्यांतील तात्पर्य असे आहे की, * नथवा टिसला याजवर जो चार्ज ठेविला होता, तो अपराध त्याने केलाच असेल याविषयी कमिशनास कांहीं भ्रांती वाटत नाहीं. जो मनुष्य गायकवाडाचे हद्दींत राहत नाही, आणि जातीचा चांभार त्याजपासून द्रव्यापहार करण्यासाठी त्याजवर खोटा आरोप आणिला हे म्हणणे कमिशनास अगदी प्रशस्त वाटत नाहीं. त्या मनुष्यास गायकवाड सरकारानी ज्या गुन्ह्याबद्दल शासन केले त्याबद्दल गायकवाड सरकार यांस दोष देण्यासारखे कांहीं गैर वाजवी झाले नाहीं. दुसरा मुकदमा एका सोनाराचा होता. कर्नल फेर यानी तो सोनार ब्रिटिश सरकारची रयत आहे असा दुराग्रह धरून त्यास कैदेतून सोडून देवविले होतें. कमिशन यांजपुढे याबद्दल जेव्हां चौकशी झाली तेव्हां त्यांस साफ कळून आले कीं, तो सोनार गायकवाड सरकारची रयत आहे. अमदाबादेस त्याचे एक घर आहे, परंतु त्याच्या आजापासून तो बडोद्यास राहतो, सबब गायकवाड सरकारच्या कायद्याप्रमाणे त्याने जर काही अपराध केला असेल तर त्याजला धरून शिक्षा करण्याचा गायकवाडास अधिकार आहे. कर्नल फेर यानी त्यास कैदेतून मुक्त करविले हे वाजवी केले नाहीं, असें कमिशनाचे ध्यानास येऊन त्यानीं त्या मनुष्यास लागलीच रेसिडेंटाकडून गायकवाड सरकारच्या कामदारांच्या स्वाधीन करविले आणि महाराजांनी त्यास पुनः कैदेत टाकिले. “ The Commission has no doubt that he must have been, to some extent at "least, guilty of the offence charged against him, as it is quite unable to conceive " that such a procedure would be taken absolutely without cause towards a man in his " position, merely with the object of extorting money from his father, who did not " even reside within the Gaekwar's jurisdiction, " "On a full consideration of the circumstances as thus glanced at, the Com- "mission is not prepared to condemn the Durbar's proceedings in treating the com- "plainant as an offender on the ground stated by it, and it considers that it was com- " petent to punish him, if the crime with which he stood charged was proved to ite satisfaction." (See Blue Bcok No. I. Page 108.)