पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचें कमिशन इंग्रज सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दल व त्यांजबरोबर केलेले कौलकरार यांस व्यत्यय आणिल्याबद्दल मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभारावर जो जब‍ दोष आणित्य होता त्याविषयी कमिशनाच्या निदर्शनास काय आले ते सांगावयाचे आहे. ब्रिटिश सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दलच्या आरोपाची चौकशी. इंडिया सरकारानी याबद्दल कमिशनास जो हुकूम केला होता त्यावरूनच मल्हारराव महाराज यांच्या इतर कृत्यांपेक्षां वरील दोन कृत्ये गवरनर जनरल यांच्या मनास विशेष लागली होती असे दिसते. नंबर २२०९ च्या पत्रांतील पांचवे कलमांत गवरनर जनरल याणी असे लिहिले आहे की, ब्रिटिश सरकारच्या रयतेस अन्यायाने आणि जुलमानें वागविल्याबद्दल जे दृढ कथन करण्यांत आले आहे त्याबद्दल कमिशनानी पूर्णपणे चौकशी करावी, आणि ब्रिटिश सरकारच्या रयतेवर जुलूम झाला आहे अशी त्यांची खात्री झाली तर त्याणी आपल्या रपोटांत प्रत्येक मुकदम्यांतील फिर्यादीची इच्छा निवृत्त करण्याकरितां गायकवाडाकडून काय देवावेले पाहिजे, आणि यापुढे बडोद्याच्या मुलुखांत राहणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या रयतेच्या संरक्षणासाठी आणि त्याजवरील जुलूम बंद करण्यासाठी काय उपाय योजिले पाहिजेत त्याविषयों सरकारास कळवावे. कर्नल फेर याणी ब्रिटिश सरकारच्या रयतेवर जुलूम केल्याबद्दलचे आरंभी काय ते तीन मुकदमे मुंबई सरकारच्या ध्यानावर आणिले होते असे त्यांच्या नंबर १४४-७५६ ता० *१८ आगस्ट सन १८७३ च्या पत्रावरून दिसतें ते मुकदमे खालीं लिहिले आहेत. १. नथवा टिसला चांभार महिकाठा एजन्सींतील राहणार याजवर महादेवाचे देवालयांत शिरून मंदीर विटाळल्याबद्दल आरोप ठेवून दंड घेतला व सात वर्षांच्या कैदेची शिक्षा दिली. २. अमदाबादच्या राहणाऱ्या एका सोनाराचे मुलावर महाराजांनी आपल्या गाडीत एका मुलास घालून नेल्याबद्दल अमदाबादेस पत्र लिहिल्याचा आरोप ठेवून कैदेत टाकिला. ३. नवसरीच्या सुभ्यानी एका पार्शास त्यानें लांच दिली नाहीं, सबब मारले आणि कैदेत टाकिलें. तो पार्शी मी सुरतेचा राहणार असे म्हणतो सबब त्यास सोडून देण्याविषयों हुकूम दिल्यावरून दरबारानी त्यास मोकळें केलें. कमिशनापुढे रुजू करण्याकरितां कर्नल फेरे याणी तेरा मुदकमे तयार केले होते त्यां- पैकी सात मुकदमे मात्र कामेशन याणी ब्रिटिश सरकारच्या रयतेवर गायकवाडानी जुलूम केला या सदराखाली आणण्याविषयों हुकूम केला. रेसिडेंट साहेब आणि कमिशन यांज- मध्ये याबद्दल पत्रव्यवहार झाला आहे त्यावरून असे दिसतें कीं, रोसडेंट साहेब यांस

ब्ल्यूबुक नंबर १ पान १९.