पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(83) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास.

  • राधनमिया जमादार यांचा दत्तक महंमद आणि दुसरे आणखी एक दोन असामी यांचे कामाचा वाजवी रीतीनें अगोदर उलगडा करण्याविषयीं सांगितले. सामल बेचरच्या दुकानचे मालक मोतीभाई आणि राधनमिया यांचा दत्तक पुत्र यांजविषयी कर्नल फेर याणी पराकाष्ठेचा पक्षपात स्वीकारिला होता, आणि त्या लोकांच्या दाव्याचा महाराजानी त्यांच्या सल्याप्रमाणे उलगडा केला असता तर त्या महत्वाकांक्षी रेसिडेंटास इतका संतोष झाला असता कीं, जसे ते मल्हारराव महाराज यांस प्रतिकूळ होऊन बसले होते तसेच ते त्यांस अनुकूळ झाले असते, परंतु कांहीं वेळ मध्ये गेला नाहीं तोच • मल्हारराव महाराज यांचे मन फिरले. त्याणी रेसिडेंट साहेब यांच्या मर्जीप्रमाणे कांहीं- एक करावयाचे नाही म्हणून स्पष्ट सांगितलें, आणि त्याप्रमाणे त्या हतभाग्य कामदारांस रेसिडेंट साहेब यांस सांगावें लागलें.

· मल्हारराव महाराज यांच्या दरबारांतील कामदार * मंडळीनी त्यांचें राज्य त्यांस व त्यांच्या प्रजेस सुखद करण्याकरितां अशा प्रकारचे अनेक यत्न वारंवार केले, परंतु महाराजानी त्यांस एका कामांत देखील यश दिलें नाहीं आणि आपले राज्य आपणास आणि आपल्या पदरच्या मंडळीस दुःखरूप करून घेतलें. महाराजांची मनोवृत्ति त्यां इतकी अनावर होती कीं, त्यांच्या मनांत भरलेले एकादें कृत्य करणें त्यांस अगदी अशक्य झालें तर ते असे देखील कधीं कधी म्हणत असत की, या राज्यकारभारांत अशा प्रकारच्या अडचणी येत असतात असे जर मला पहिल्यानेच समजलें असतें तर मी पाद्रे सोडून बडोद्यास आलोच नसतो. खरोखर महाराजानी असें केलें असतें तर राज्यावर त्यांचा मोठा अनुग्रह झाला असता !! सर बार्टल फियर या दूरदर्शी पुरुषाने मल्हारराव महाराज यांजविषयीं ता ० ७ नोवेंबर सन १८७३ रोजी फार उत्तम भविष्य कथन केले होते आणि शेवटी तेच खरे झाले. सदद्दू तारखेस त्याणी दादाभाई यांस पत्र लिहिले आहे त्यांत असें लिहिले आहे की, इंग्लंडांतील सर्व बारिस्टर जर मल्हारराव यांस ते देखील त्यांस त्यांच्या स्वत:च्या आचरणापासून उद्भवणाऱ्या दुष्ट परिणामापासून बचावूं शकणार नाहींत असे मला वाटतें. सला देण्यासाठी त्यांच्या आधीन केले तर मल्हारराव महाराज यांच्या दरबारांतील सर्व कामदार बदसलागार होते, आणि त्यांणीच त्यांस बदसला देऊन त्यांचे राज्य बुडविले असे म्हणणारे लोकांनी सर बार्टल फियर यांचे वरील म्हणणे ध्यानांत ठेविण्या योग्य आहे.

  • " दरबारांतील कामगार

नाहीं असें समजावें. या शब्दांत अधिकारावरील निरक्षर मराठयांचा समावेश होत "It is a great pity that he can not be allowed to get the best advice procu- rable, and, I believe, he could not have a better adviser than you, but, I fear, he could not be saved from himself, and from the evil consequences of his own conduct if he had the whole Bar of England at his disposal " ( Dadabhoy's pamphlet, finishing page in which “ Letters from Sir Bartle Frore" are published.)