पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मोडचे कमिशन ते कमिशनच्या कामास सुरुवात होऊन बरेच दिवस झाल्यावर सन १८७३ च्या डिसेंबर. महिन्यांत बडोद्यास आले. कमिशनच्या कामास सुरुवात होईपर्यंत महाराजांचा व राज्याचे हितचिंतक कामदार मंडळीचा महाराज आणि रेसिडेंट साहेब यांजमध्ये सलूख करून कमिशनापुढे जितक्या फिर्यादी कमी करवतील तितक्या कमी करण्याचा व फिर्यादी लोकांचे वाजवी हक्क त्यांस देऊन कमिशनापुढे त्यांजकडून महाराजांनी आपले समाधान केले असे सांगविण्याचा प्रयत्न चालू होता. कमिशनापुढे कोणत्या फिर्यादी न्याव्या हें रेसिडेंट साहेब यांच्या मर्जीवर होते. ज्या लोकांनी रेसिडेंट साहेब यांजपुढे फिर्यादी केल्या होत्या त्या लोकांचे रेसिडेंट साहेब यांच्या विचाराने महाराजांनी समाधान केले असतां त्या लोकांस रेसिडेंट साहेब कमिशनापुढे नेणार नाहीत असा संभव होता, आणि तेणेकरून महाराजांच्या राज्यकारभारावर जो बदनामी आली होती ती कमी होणार होती. याबद्दल उपाय काय तो येवढाच होता की, असंतुष्ट झालेल्या लोकांचें रेसिडेंट साहेब यांच्या विचाराप्रमाणे समाधान करून राज्यकारभारामध्ये त्यांच्या सलेप्रमाणे सुधारणूक करावी. रावसाहेब बापूभाई दयाशंकर आणि गोविंदराव मामा याणी कर्नल फेर यांस त्याब- द्दल विनंती केली, आणि त्याणी त्यांस असे उत्तर दिले कीं, मजकडे जे फिर्यादी आले आहेत त्यांच्या हक्काबद्दल वाजवी रीतीनें महाराजानीं निकाल केला पाहिजे. राज्यांत चांगली राज्यव्यवस्था स्थापीत केली पाहिजे, आणि मला विश्वास वाटण्यासाठी मी ज्या कांही गोष्टी सांगेन त्याबद्दल महाराजानी तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे. कमिशना- पुढे फिर्यादी नेण्याचे काम माझे आहे. ज्या लोकांचे महाराज समाधान करतील त्या लोकांसी कमिशनापुढे नेणार नाहीं. त्याचप्रमाणे राज्यकारभारांतील गैरव्यवस्था दूर करून महाराज जसजसा बंदोबस्त करीत जातील तसतसे मी कमिशनास आणि मुंबई सरकारास कळवीन, आणि तेणेकरून महाराजांच्या राज्यकारभारावरील नाखुषी कमी होईल, ही रेसिडेंट साहेब यांची सल्ला अगदी मोकळ्या मनाची होती असे सदई कामदार यांस वाटले. रेसिडेंट याणी आपल्या सरकारास जी गाऱ्हाणी सांगितली होती ती खरी ठरून त्यांत मल्हारराव महाराज यांचा बचाव व्हावा असा हा मार्ग होता. मल्हार- राव महाराज यांस वश होऊन रेसिडेंट साहेब याणी आपल्या सरकारास फसविले किंवा त्यांच्या हुद्याच्या नात्याने जे कांही त्यांचे कर्तव्य होतें तें त्याणी वर्ज केले असे मुळीच होणार नव्हते. महाराजांस कोणत्याही प्रसंगी रेसिडेंट यांची सल्ला विचारण्याचा च त्यास महाराजांला सल्ला देण्याचा पूर्ण हक्क होता, आणि कमिशनाच्या नेमणु- कीमुळे त्या संबंधास काही बाघ आला नव्हता. कामदार मंडळीनी रेसिडेंट साहेब यांचे म्हणणे महाराजांस कळविले, आणि ती गोष्ट महाराजांच्याही पसंतीस उतरली. रेसिडेंट साहेब यांस प्रचीत येण्याकरितां महाराजानी कोणत्या कामाचा कसा निकाल करावा याबद्दल कर्नल फेर यांस विचारल्यावरून त्याणी सामल वेचर यांचे वारस मोतीभाई, १३-