पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कमिशनची नेमणूक ही कर्नल फेर यांच्या उद्योगाची पूर्ण सफळता होय. कमिशन नेमिल्यापासून बडोद्याच्या दरबारावरील त्यांचे वजन कमी तर झाले नवतेंच, पण उलटें ज्यास्त वाढलें होतें तथापि देखील गवरनर जनरल यांच्या मनांत तसा कुतर्क आला आणि त्याणी कमिशनास याबद्दल मोठ्या काळजीनें सूचना केली. नंबर २२०९

  • च्या

गवरनर जनरल यांच्या पत्रांतील नवव्या कलमांत असे लिहिले आहे की, " आणखी ह्या " तपासापासून रोसेडेंट साहेब अधिकार भ्रष्ट झाले अशी कदाचित कल्पना निघेल. तसा प्रकार न होण्याविषयी कमिशन याणी फार काळजीपूर्वक सावधगिरी ठेवावी. जे फिर्यादी लोक कमिशनाकडे रोसेडेंट साहेब यांच्या मार्फतीशिवाय येतील त्यांस कमि- “ शन याणीं रोसेंडेंट साहेब यांस सोपावें आणि त्यांच्यापुढे चौकशी होते वेळी बडो- " द्याच्या कामाचा जो संबंध राहील त्याशिवाय त्याणी दुसरा संबंध बडोद्याच्या राजाशी ठेवू नये. 66 66 99 66 वरील सुचना आणि गायकवाडाच्या राजधानीत कर्नल फेर याणी लाविलेला जाहिरनामा ध्यानांत आणून विचार केला म्हणजे असे कळोन येतें कीं, कमिशनाची नेमणूक केल्यापासून व गायकवाडाच्या प्रजेस फिर्यादी करण्याविषयों उत्तेजन दिल्यापासून मल्हारराव महाराज यांच्या सत्तेचें कितीही मातेरे झाले तरी त्याविषयी कांहीं देखील पर्वा बाळगण्यांत आली नसून रेसिडेंट यांचे वजन कमी दिसू नये याविषयी मात्र पूर्ण काळजी वागविण्यांत आली होती. मल्हारराव महाराज अगदी काकुळतीने म्हणाले कों, कमिशन नेमण्यापासून माझ्या राज्यकारभारांत प्रत्यक्ष मध्यस्ती केल्यापेक्षाही ज्यास्त वाईट परिणाम होईल, आणि प्रजेवरील माझा बोज कमी होऊन ती माझा अधिकार तुच्छ मानील तरी गवरनर जनरल याणी त्यांची विनंती मान्य केली नाहीं, आणि शेवटी महाराजांनी म्हटले होते तसेच झालें. ता० ८ नोवेंबर सन १८७३ रोजी कमिशनाचे सर्व सभासद बडोद्यास दाखल झाले, आणि ता ० नोवेंबर रोजी कमिशनाच्या कामास सुरुवात झाली. कमिशनापुढे दरबारतर्फे जाबजबाव देण्यासाठी रावसाहेब बापुभाई दयाशंकर, गोविंदराव केशव जवळेकर, बळवंतराव येशवंत हुजूर फौजदारीचे मुख्य अधिकारी यांस महाराजांनी नेमिलें होतें, आणि रावसाहेब वासुदेव जगन्नायककर मुंबई हायकोर्टचे वकील हे महाराजांचे मुख्य एजंट होते. या समयास दादाभाई नवरोजी यांची सल्ला महाराजांस फार उपयोगी पडेल यासाठी त्यांस विलायतेहून बोलवावे अशी कामगार मंडळीनी महाराजांस आग्रहपूर्वक विनंती करून दादाभाई यांस ताबडतोब निघून येण्याविषयों पत्र पाठविल्यावरून

  • The Commission will further be careful to give no countenance to the idea

which may possibly arise that their inquiries are intended to set aside the authority of the Resident. They will refer to the Resident any complainants who may appeal to them direct, and they will bave no connection with the affairs of the Baroda State except such as plainly come within the limits of their inquiries. " (See Blue Book No. I. Page 31 Section 9.)