पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचे कमिशन. (९५) नास आले. कमिशनच्या रिपोर्टावर त्यानी ठराव केला त्यांत महाराजांच्या अधिकारास आणि हक्कास तिळमात्रही ढका लाविला नव्हता. यावरून ते फार मोठ्या मनाचे आणि क्षमावान् आहेत यांत कांही संशय नाहीं. मल्हारराव महाराज यांची वाजवी आणि विनययुक्त विनंती मान्य न करण्याचा गवरनर जनरल यांच्या मनांतील हेतु दुसरा कोणताही असो, पुष्कळ अनुभवावरून आपणास येवढे समजतें कीं, आपला वर्चस्वपणा स्थापित करण्यासाठी इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी एक वेळां पुढे पाऊल टाकिले की त्यांत कितीही चुका व दोष असले तरी ते मग आपले पाऊल मागे घेत नाहीत. त्यांस असे वाटतें कीं, आपण तसे केले तर देशी राज्यांवरील आपला बोज कमी होईल व लोकांचा त्या संबंधानें भलताच समज होईल, म्हणून दुराग्रहाने ते आपण आरंभिलेले कृत्य शेवटास नेतात. सर रिचर्ड मीड याणी रेसिडेंट यांस जाहिनामा प्रसिद्ध करण्याबद्दल हुकूम देण्यांत मोठी चूक केली होती, पण तो रद्द केल्याने आपले व रोसडेंटाचें वजन कमी होईल आणि कमिशनापुढे फि र्यादी करण्यास कोणी येणार नाही आणि त्यामुळे कमिशन नेमिण्याचा हेतु निष्फळ होईल येवढ्याच कारणानें तो जाहिरनामा कायम ठेविला. गायकवाड सरकारच्या अधिकाराला त्यापा- सून पराकाष्ठेचा धक्का बसला असतांही त्यांची त्यांणी तिळमात्र देखील परवा केली नाहीं असा अविचार इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांकडून झाला असतां त्यांस त्याबद्दल अगदी स्वरूप प्रायश्चित घेऊन दोष निवृत्ति करितां येते. “ आम्हास त्याबद्दल वाईट वाटतें 99 ह्या शब्दोच्चारानें, महापातकी अज्यामिळ मरण काळी " नारायण " शब्दोच्चारें करून जसा निष्पाप झाला तसे इंग्रज लोकांच्या दोषाचें क्षालन होतें. जर दोष कांहीं जबर असला तर वरील वाक्यांत " फार " या शब्दाची योजना केली म्हणजे झाले. “ Government regrets general notice " या वाक्योच्चारे करून गवरनर जनरल यांचे आणि But we regret to find that we have gone beyond the wish of the Governor General on that point" या वाक्योच्चाराने कमिशन यांचे त्या जाहिरनाम्याच्या संबंधाने सर्व दोष जाऊन त्या जाहिरनाम्यास पूर्ण पवित्रता आली. अशी ही देशी राजाबरोबर वागण्याची इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांची पद्धत आहे. अशा प्रसंगी न्यायाचें फार उल्लंघन होतें. 66 देशी राज्याचें वाजवी म्हणणे ऐकिले असतां व त्यास विशेष दयेने वागविले असतां च त्यांचे अधिकार, हक्क, आणि मानमरतब पूर्णपणे पाळिले असतां त्यांच्या दरबारांत इंग्रज सरकारचे आहे त्यांहून देखील ज्यास्त वजन वाढणार आहे, व ते बाहु बळाने पाहि- जेल ते करण्यास समर्थ असतां आपणास पूर्ण न्यायाने आणि दयेनें वागवीत आहेत या बदल देशी राजांच्या मनांत उलटी विशेष पूज्यबुद्धि उत्पन्न होणार आहे. इंग्रज सरकार निर्बळ म्हणून आमचे हक्क पाळितात किंवा ते आम्हास भितात असे मुर्खपणाचे विचार त्यांच्या मनांत येण्याचा तिळमात्र तरी संभव आहे काय ? अगदी नाहीं. शहाणे इंग्रज लोक त्यांस तसे कां बरे वाटतें ? याविषयों आपली होते आणि कांहीं देखील तर्क चालत नाहीं. मग येवढे मोठे तर मतीच कुंटित