पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- चौकशी आणि त्यांच्या सूचना आपल्या मनांत जी गोष्ट वागली आहे ती शेवटास नेण्यास साह्यभूत होतील आणि मी जो हेतु मनांत धरून हें कमिशन नेमिलें आहे त्याजमध्ये इतकें महत्व आहे आणि आपल्या आणि ब्रिटिश सरकारामध्यें जो संबंध आहे त्यास अंतरंगपणानें तो हेतु इतका लागू आहे की, कमिशनानीं जाऊन आपले काम सुरू कलेच पाहिजे. मल्हारराव महाराज यांची विनंती गवरनर जनरल यार्नी अमान्य करावी असे त्या खलित्यांत कांहीं गैर नव्हते. आपल्या राज्याचा राज्यकारभार अव्यवस्थितपणे चालला आहे, अशी यानींकबुलायत दिली होतीच आणि गवरनर जनरल यांस संतोष होईल, अशा रीतीची राज्यव्यवस्था करण्याविषयी ते वचनाने बांधलेही गेले होते. तहनाम्याअन्वयें आपल्या हक्काविषयों देखील त्यानी अगदीं लीनतेनें विनंती केली होती. इंग्रज सरकारास कमिशन नेमून माझ्या राज्यकारभाराची चौकशी करण्याचा अधिकार नाही अशी कांहीं निक्षून तक्रार घेतली नव्हती. कमिशनाची चौकशी संपल्यावर अठरा. महिन्यांची महाराजांस मुदत दिली होती तशा प्रकारची कांही अट करून कमिशन तह- कूब केले असते तर गवरनर जनरल यानी फार न्यायाचे वर्तन केले असे लोकांस वाटले. असतें, आणि महाराजांचा बोज कायम राहून ते लार्ड नार्थब्रुक यांचे विशेष ऋणी. झाले असते, आणि कमिशनच्या योगाने त्यांच्या दरबारांतील सरदार व मानकरी लोक आणि दुसरी प्रजा विशृंखल होऊन राजाच्या आज्ञा पाळीनातशी झाली तशी राज्यांत बंडाळी माजली नसती. ही गोष्ट ध्यानांत ठेविण्यासारखी आहे कीं, इंग्रज सरकारच्या रयतेवर जलम केल्या- बद्दल व इंग्रज सरकाराबरोवर केलेल्या कौल करारास व्यत्यय आणिल्याबद्दल महाराज यांच्या राज्यकारभारावर जे दोष आणिले होते त्याजविषयों महाराज आणि दरबारचे मुत्सद्दी यांच्या ध्यानीं मनीं देखील काही गोष्ट नव्हती. त्याचप्रमाणे कांटिनेंटच्या फौजेंन आपण अव्यवस्था केली आहे, आणि त्याबद्दल इंग्रज सरकारच्या सूचना अमलांत. आणण्यास हयगय केली आहे हे देखील त्यांच्या मनांत सुद्धां आले नवते; कारण त्या संबंधानें दरबाराकडून कांहीं एक गैरवाजवी झाले नव्हते. याबद्दल स्पष्ट रीतीने महारा- जांच्या खलित्यांत गवरनर जनरल याणी खुलासा केला असता तर त्याविषयींची लागलीच संशय निवृत्ती करण्याचा दरबारांतून प्रयत्न केला असता. " कामेशन मेनण्याचा हेतु फार महत्वाचा आहे, आणि दोन्ही सरकारामध्ये जो संबंध आहे त्यास तो अंतरंगाने लागू आहे." अशा मोहोगम वाक्याचा खरा भाव काय हें बडोद्याच्या दरबारास कांहीं समजले नाहीं. त्यांस असे मात्र वाटले की, महाराजांची वाजवी विनंती ज्यापेक्षां गवरनर जनरल याणीं अमान्य केली त्यापेक्षां गवरनर जनरल यांच्या दरबारास जाण्यास आणि मुंबईचे गवरनर यांचा सत्कार करण्यांत मल्हारराव महाराज याणी, दरबारांत आग्रस्थानी बसण्याची तक्रार उपस्थित झाल्यामुळे हयगय केली त्याबद्दल त्यांस कांहीं तरी प्रायश्चित भोगावे लाग- णार आहे. परंतु गवरनर जरनलच्या संबंधानेही ही त्यांची समज खोटी होती असे शेवटी निदर्श-