पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचड मीडचें कमिशन (९३ ) असतां आपली मजवर विशेष कृपा होईल सबब अशी संधी मी घालवणार नाहीं. तारीख २५ आगस्ट सन १८७३ चा मुंबई सरकारास भी खलिता लिहिला त्यांत देखील माझ्या राज्यकारभारांत सुधारणूक करण्याची माझी इच्छा मी प्रदर्शित केली आहे, आणि हा माझा हेतु सिद्धीस नेण्यासाठी रेसिडेंट यांजपाशीं मी ब्रिटिश सरकारच्या चाकरींतील अनुभवी आणि विद्वान असे तीन गृहस्य मागितले आहेत. मी माझ्या राज्यांत चांगली राज्यव्यवस्था स्थापित करण्यास परम उत्सुक असून ही गोष्ट थोड्याच काळांत आपल्या अनुभवास आणून द्यावी असा माझा हेतु आहे. कर्नल फेर मला या कामांत योग्य मदत देतील आणि त्यांच्या व माझ्या विचाराने राज्यांत सुधारणूक होईल, लार्ड साहेब, आपल्या आश्रयाखाली जी राज्ये आहेत त्यांत माझे राज्य पहिल्या प्रतीचे असून आणि शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली प्रत्येक प्रसंगी ब्रिटिश सरकाराबरोबर पूर्ण इमान- दारीने वागत आले आहे; आणि आपल्यापूर्वी जे गवरनर जनरल झाले त्यांनी या वेळेपर्यंत या राज्याचे उदार मनाने संरक्षण केले असून कोणत्याही प्रसंगी या राज्याची अब्रु कमी होईल असे काही कृत्य केले नाहीं; पण उलट या राष्ट्राची जितकी योग्यता वाढवेल तितकी वाढविली आहे, आणि आतां जर आपण आपल्या कारकीर्दीत या राज्याच्या प्रतिषेस आणि हक्कास धोका येईल असे कांहीं कराल तर त्यापासून माझे मनास किती दुःख होईल याची कल्पना आपणच करावी. ब्रिटिश सरकारानी आजपर्यंत दोन्ही सरकारांमध्ये झालेले कौल करार पूर्णपणे इमा- नानें पाळिले आहेत आणि त्याजविषयों वारंवार वचने दिली आहेत, त्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि मला पूर्ण भरंवसा आहे कीं, जोपर्यंत भी होऊन माझे राज्यांत सुधारणूक करीन तोपर्यंत कोणत्याही रीतीनें ब्रिटिश सरकार माझ्या राज्यकारभारांत मध्यस्ती करून या राज्यास हलकेपणा आणणार नाहींत. आपण मला असे कळविले आहे की, तुमच्या राज्यकारभारांत हात घालण्यासाठी काही कमिशन नेमिण्यांत येत नाहीं; परंतु कमिशनाची नुस्ती नेमणूक केल्याने प्रत्यक्ष मध्यस्ती केल्यापेक्षां देखील ज्यास्त वाईट परिणाम होईल. लौकिकांत माझी मानहानि होईल, माझ्या प्रजेवरील माझा दाब कमी होईल, आणि ते माझा अधिकार तुच्छ मानतील. राज्यांत चांगली राज्यव्यवस्था असावी हाच आपला मुख्य हेतु आहे आणि तो हेतु परिपूर्ण करण्यास मी पराकाठेचा उत्सुक आहे तर मग कमिशन नेमण्याची काय बरे गरज आहे? हिंदुस्थानांत ब्रिटिश सरकार सर्वांहून श्रेष्ठ आहेत, आणि देशी राज्याचे अस्तित्व आणि भरभराठी त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे, पण ब्रिटिश सरकार आपल्या शक्तीचा उपयोग नेहेमी न्यायाने करितात आणि देशी राज्यांचे अधिकार आणि हक्क कायम ठेवि- ण्याविषयों ते नेहेमी तत्पर आहेत म्हणून मला तिळमात्र देखील संशय नाहीं की माझी विनंती अमान्य करून मला प्रतिकूळ उत्तर पाठविण्यांत येईल. लार्ड नार्यत्रुक यांस ही विनंती मान्य झाली नाहीं. तारीख १५ नवंबर सन १८७३ रोजी त्यांनी महाराजांस खलिता लिहिला; त्यांत ते असे लिहितात की, कमिशनची