पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हा खलिता महाराजांस पोहोचला तेव्हां कर्नल फेर यांचे प्रयत्न किती सफल झाले हे महाराजांस व दरबारच्या कामदारांस समजलें, दरबाराबरोबर कर्नल फेर यानीं त्यांची कारकीर्द सुरू झाल्या पासून जो पत्रव्यवहार केला होता त्यावरून त्यांची आपल्या राज्यावर वक्रदृष्टि आहे असे महाराजांस व दरबारी लोकांस समजले होतें, परंतु त्यांजकडून जे गिल्ले करण्यांत येतील त्याबद्दल मुंबई सरकार आपणास खुलासा विचारतील. एकदम कांहीं भलतीच गोष्ट करण्यांत येणार नाही अशी दरबारची खात्री होती, परंतु जेव्हां हा खलिता दरबारांत दाखल झाला तेव्हां त्यांस समजले की, आपण कल्पना करण्यांत अगदी चुकलो. कर्नल फेर यांचा प्रयत्न अशा प्रकारें सफळ झालेला पाहून त्यांच्या वर्तणुकीबद्दल तक्रार सांगण्याचा व तहनाम्याअन्वयें कमिशन नेमून चौकशी करण्याचा इंग्रज सरकारास हक्क प्राप्त होत नाही असा निकराने वाद करण्याचा तो समय नव्हता; कारण मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभार असा न्यायी नव्हता की, त्यांच्या कामदारांनी त्यांस तहनाम्याअन्वयें त्यांच्या अधिकाराचें संरक्षण करण्याकरितां इंग्रज सरकाराबरोबर निकराने वाद करण्या- आपल्या देशांतील राजे लोकांनी आणि त्यांच्या दरबारांतील मुत्सद्दी लोकांनी ही गोष्ट तर पूर्णपणे लक्षांत ठेविली पाहिजे की, त्यानीं प्रजेविषयीं आपले कर्तव्यकर्म योग्य रीतीने बजाविल्यावांचून त्यांस आपल्या राज्याधिकाराविषयों इंग्रज सरकारा बरोबर निकराने वादविवाद करणे कधीही चांगले दिसणार नाही. विषयीं सला द्यावी. महाराजांच्या मनांत खरोखर राज्यकारभारांत योग्य सुधारणूक करावयाची आहे तर त्यानी गवरनर जनरल यांस त्याबद्दल खात्री पूर्वक वचन देऊन कमिशन तहकूब करण्या विषयों विनयपूर्वक विनंती करावी आणि त्यांतच तहनाम्याअन्वयें इंग्रज सरकाराबरोबर जो संबंध स्थापित झाला आहे त्याअन्वयें कमिशन नेमिण्याचा इंग्रज सरकारास हक्क नाहीं। याविषयों ही सौम्य रीतीने उल्लेख करावा अशी दरबारी लोकांनी महाराजांस सला दिली, आणि त्याप्रमाणे तारीख २५ आक्टोबर १८७३ रोजी गवरनर जनरल यांस खलिता लिहिला त्यांतील तात्पर्य येणेप्रमाणेः- आपणास ज्या गोष्टी कळल्या आहेत त्यांचे स्वरूप आणि कारणे सांगण्याचा आतां वेळ राहिला नाही. फार काळापासून ज्या रीतीने राज्यकारभार चालला आहे, त्याजमध्ये दोष काय आहेत याविषयी चौकशी करीत बसणे हे सर्वदा त्रासदायक आणि निष्फल आहे. आपल्या खलित्यांतील लेखाच्या धोरणावरून राष्ट्राचे कल्याण व्हावे हाच काय तो कमिशन नेमि- ण्याचा आपला हेतु आहे असे समजून येतें, त्यास हा आपला मुख्य हेतु जर कमिशन नेमून चौकशी केल्यावाचून सफल होईल तर मुद्दाम कमिशन नेमून आपण या राज्याची जगापुढे विटंबना करणार नाही. कर्नल फेर यांचा मी फार आभारी आहे व त्यांस मी माझे मित्र आणि हितेन्छु मानि- तो. त्यांनी सुधारणुकीकडे माझे लक्ष लाविले असून, त्यांच्या सूचनेप्रमाणे मी सुधारणा केली