पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचें कमिशन. ( ९ १ ) या तारेचें उत्तर कमिशनास असे आले की, जाहिरनामा लाविल्याबद्दल हिंदुस्थान सरकारास वाईट वाटत आहे, परंतु तो आतां रद्द करूं नये. तुम्ही शक्य असेल तितकें करून त्या जाहिरनाम्याचा अम्मल अतिशय मर्यादित कराल अशी व्हाइसराय साहेब. आशा ठेवितात. * मुंबई सरकारानी दुसरी अशी एक शिफारस केली होती की, दिवाण नानासाहेबा खानवेलकर, महालाानेहाय सरसुभे हरीबा गायकवाड, आणि सरसुभे यांचे डेप्युटी नारायण- भाई ललुभाई यांस कामावरून दूर करणे गायकवाडास भाग पडण्याची सत्ता आपणास द्यावी. हो शिफारसही गवरनर जनरल याणी मान्य केली नाहीं. कमिशनचा रिपोर्ट. आल्यावर याविषयी जे कांहीं जरूर वाटेल ते करण्यांत येईल असे मुंबई सस्कारास कळविलें. कमिशन नेमण्याविषयों गवरनर जनरल यानी ठराव करून तारीख १५ आक्टोबर सन १८७३ रोजी मल्हारराव महाराज यांस खलिता लिहिला, त्यांतील तात्पर्य असे आहे की, मुंबई सरकाराकडून आपल्या राज्यकारभाराविषयों नुक्कीच पत्रे आली आहेत त्यांत आम्हांस असे कळविण्यांत आले आहे की, आपल्या प्रजेतील कांहीं वर्गाच्या लोकांत असमाधान उत्पन्न होऊन बखेडे झाले आहेत आणि ते इतक्या शिखरास जाऊन पोहो- चले आहेत की, त्यापासून देशाची शांतता भंग होऊं पहात आहे. यासाठी जे दृढ कथन केले आहे त्याविषयी चौकशी करणे जरूर झाले आहे. चौकशी करण्यासाठी थोड्याच दिवसांत एक कमिशन नेमिण्याचा निश्चय केला आहे. या कमिशनांत मोठ्या पदवींचे आणि अनुभवी असे तीन कामदार नेमिण्यांत येतील आणि ते आपल्या चौकशीचा परिणाम सरकारास कळवितील. हे कमिशन नेमून आपल्या राज्यकारभारांतील बारीक सारीक गोष्टींत मध्यस्ती करावी. असा माझा हेतु नाहीं. कमिशनाचे कर्तव्यकर्म हे आहे की, जे दृढ कथन करण्यांत. आले आहे ते खरे आहे की काय? याबद्दल चौकशी करावी, आणि जरूर वाटेल तर पुढील राज्यव्यवस्थेकरितां मी आपणास काय सला द्यावी त्याविषयी त्यांनी मला सूचना कराव्या. आपल्या कंटिजंटच्या फौजेची नवीन व्यवस्था करण्याविषयों जो महत्वाचा विचार निघाला आहे त्याविषयों कमिशन यास चौकशी करण्याविषयों हुकूम देण्यांत येईल आणि त्यांच्या चौकशीचा परिणाम दोन्ही सरकारांसही समाधानकारक होईल. आपण रेसिडेंटाजवळ असे बोललांत की, ब्रिटिश सरकारची सला ऐकिण्यास आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास मी तत्पर आहे त्यावरून माझी खात्री झाली आहे की, आपण कमिशनास प्रत्येक गोष्टींत आपल्या सामर्थ्यानुरूप मदत द्याल. “ Government regrets general notice. but it shonld not be recalled. Viceroy trusts you will restrict its affect as to protection. to narrowest limits possible." (See Blue Book No. I. Page 5-4).