पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर रिचर्ड मीडचे कमिशन. चें पत्र लिहिले त्यावरून आणि हिंदुस्थान सरकारांनी * ता० १९ सप्टंबर सन १८७३ नंबर २२०९ चे पत्र मुंबई सरकारास लिहिले त्यावरून मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारावर कोणते कोणते दोष आणिले होते ते समजण्यांत येतात. १. गायकवाड सरकारच्या मुलखांत राहणाऱ्या इंग्रज सरकारच्या व दुसऱ्याच्या रयतेवर अन्यायाचे जुलूम होतात. २. इंग्रज सरकार आणि बडोदें सरकार यांजमध्ये तहनाम्यावरून जो संबंध स्थापित झाला आहे त्यास व्यत्यय येत आहे. ३. राज्यांतील सर्व लोकांच्या मनांत असमाधान उत्पन्न झाले आहे, आणि विजापूर परग- ण्यांत त्या असमाधानाचा परिणाम असा झाला आहे कीं, कांही ठाकूर लोक बंड करण्यास प्रवृत्त झाले आहेत, आणि त्यामुळे देशाची स्वस्थता भंग होऊं पाहात आहे. ४. दिवाण आणि दुसरे कारभारी जो कोणी लांच देईल त्यास अधिकाराच्या जागा विकतात. ५. सभ्य लोकांच्या स्त्रिया व मुली यांस त्यांच्या कुटुंबांतून जबरीने गुलामाप्रमाणे घरचे काम करण्यासाठीं व दुसऱ्या वाईट गोष्टीसाठी पळवून नेतात. ६. भाऊ शिंदे यांच्या मरणाबद्दल गायकवाड सरकारचे म्हणणे फारच गैरभरंवशाचे असून आतां आणखी शहरच्या दरवाज्याजवळ फटके मारितांना एक मनुष्य • मेल्याबद्दल फिर्याद झाली आहे. ७. जुलमामुळे सरहद्दीवरील गांवें लोकांनी सोडून दिली आहेत. ८. दरबारच्या लालची चालीमुळे कंटिंजेंटच्या फौजेत फार अव्यवस्था झाली आहे, आणि तहनाम्याअन्वयें ब्रिटिश सरकारच्या सूचना अमलांत आणण्यास गायकवाड सरकाराकडून हयगय करण्यांत येते. सदरील नंबर २२०७ च्या गवरनर जनरलच्या चरून कमिशन नेमून चौकशी करण्यास विशेष पात्र गवरनर जनरलच्या मनांत आले ते समजून येतात. या कलमाचा भावार्थ असा आहे. कीं, गवरनर जनरल यांस जे कांहीं सरकारी नात्याने कळविण्यांत आले आहे त्यावरून त्यांचा अभिप्राय असा झाला आहे कीं, गायकवाड सरकारच्या राज्यकारभारांतील अव्यवस्थे- मुळे त्यांच्या प्रजेच्या व त्यांच्या मुलुखांत बसणाऱ्या इंग्रेज सरकारच्या प्रजेच्या सुखास अतिशय धोका येण्याची चिन्हें दिसतात इतकेंच नाहीं, पण बडोद्याच्या सरहद्दीवर ब्रिटिश सरकारचा व देशी संस्थानिकांचे मुलूख आहेत त्यांची शांतता आणि उत्तम राज्यव्यवस्था यास उपद्रव होऊं पाहात आहे आणि दोन्ही सरकारच्या दरम्यान तहनाम्यावरून जो पत्रांतील चौथ्या कलमाच्या पूर्वार्धा- असे वरील दोषांपैकी कोणते दोष

ब्ल्यूबक नंबर १ पान ३०.