पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. पूर्वीच्या भागांत मल्हारराव महाराज गादीवर बसल्यानंतर त्याणी आपल्या राज्याचा कारभार कोणत्या रीतीने चालविला आणि कोणकोणत्या बऱ्या वाईट गोष्टी केल्या या विषयों माहितीप्रमाणे सांगण्यांत आले आहे. आतां या भागांत सर रिचर्ड मीड यांच्या कमिशनापुढे जे काम चालले त्याविषयी निरूपण करावयाचे आहे. मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारांत न्यायाचा अंश फार थोडा होता हे तर स्पष्टच आहे, पण कमिशनापुढे काम चालले त्यांत कांहीं कारस्थान होते की काय, किंवा न्यायाला अनुसरून जे काही करणे अवश्य होतें तें अगदी पवित्र मनाने केले होते, हे देखील आपणास पाहिले पाहिजे. यासाठी खाली लिहिलेल्या गोष्टींविषयों या भागांत मुख्यत्वेंकरून विशेष विचार केला आहे, त्या ह्याः— १. कमिशन नेमण्याविषयों मुंबई सरकारानी हिंदुस्थान सरकारास शिफारस करितांना मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभारावर असे कोणते जबर आरोप आणिले होते कीं, ज्यांच्या भारदस्तपणामुळे हिंदुस्थान सरकारास मुंबई सरकारच्या मतास अनुमोदन देणें प्राप्त झालें. २. जे आरोप आणण्यांत आले होते त्यापैकी कमिशन नेमून चौकशी करण्यास विशेष पात्र असे कोणते आरोप गवरनर जनरल यांस कौन्सिलांत मान्य झाले, म्हणजे कमिशन नेमिण्याचा प्रधान हेतु काय ? ३. गवरनर जनरल याणी कमिशनास चौकशी करण्याविषयों जे नियम घालून दिले होते त्याविषयी मुंबई सरकारचे काय म्हणणे होते आणि त्याचा शेवट निकाल काय झाला. ४. कमिशनच्या संबंधानें मल्हारराव महाराजांचें काय म्हणणे होते आणि त्याचा परिणाम काय झाला, ५. ज्या आरोपाच्या महत्वावरून गवरनर जनरल याणी विशेष करून कमिशन नेम- ण्याविषयीं ठराव केला त्याविषयी कमिशनाच्या निदर्शनास काय आले. ६. त्याखेरीज दुसऱ्या आरोपाबद्दल कमिशनानी काय अभिप्राय दिले. ह्या महत्वाच्या गोष्टींविषयीं योग्य रीतीनें निरूपण केले म्हणजे या कमिशना- पुढे चाललेल्या कामांचे एकंदर सार लोकांस कळविल्याचें श्रय येईल इतकेच नाहीं, पण मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभाराचें एकंदर स्वरूपही कळून येईल. वर निवडलेल्या प्रत्येक गोष्टीविषयों अनुक्रमाने सांगण्यांत येईल यास्तव तिकडेस वाच - •णारांनी आपले अवधान ठेविले पाहिजे.

मुंबई सरकारांनी इंडिया सरकारास ता० २९ आगस्ट सन १८७३ रोजी नंबर ६४ ब्ल्यूबुक नंबर १ पान १६.