Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर तोफा ते इष्टुर फांकडा म्हणोन गोरा जँहाला होता, तो भेटला. आणि धीर दिला. नंतर दादासाहेब यांनी आपली हकीगत सांगून चौयाई राज्यांत देण्याची लिहून दिली. इष्टुर साहेब यांस दादासाहेब बोलले की, " 'तुम्ही आम्हांस राज्यावर नेऊन बसवावें " याप्रमाणे सांगून दोन वर्षे दादासाहेब यांस आपले जवळ मुंबईत ठेविलें. तेव्हां हरीपंत तात्या हे सुरतेहून निघोन पुरंदरास आले. मग इंग्रज याणे पलटणे गोन्यांची पंचवीस हजार जमा करून बरोबर शंभर व दहा हजार घनतुरुप या प्रमाणे फौज जमा करून दादासाहेब यांस बरोबर घेऊन दाभाड्याचे तळेगांवी आले. तेथे मुक्काम केला. पेशवे यांणी पुण्यावर फौजेचा जमाव करून शहर ओस केलें. नारो आपाजीनों दरोबस्त कडबा भरला. त्याचे कारण की, शहर गलीमाचे हाती द्यावयाचें नाहीं. मग एके दिवशी सवाई माधव साहेब पुरंदराचे किल्यावर प्रातःकाळी प्रहर दिवसास तिरंबाजी खेळत होते. त्या समयी वर्ष पांचवें होतें. तेव्हां दादासाहेब यांची मसलत सिद्धीस गेल्यास आपल्यास पृथ्वीत जागा नाहीं सारखी होईल म्हणोन [ कारभारी ] विचारांत निमग्न होते. तेव्हां सखाराम बापू यांणी उत्तर केले की, आपले यजमान तिरंबाजी करीत आहेत त्यांजला विनंती करूं. त्यांचे मुखांतून काय अक्षरें निघतात त्या प्रमाणे पुढे करावे. सर्वांचे मर्जीस उतरून रुकार दिल्हा. तेव्हां सखाराम बापूंनी विनंती केली कीं, दाभाड्यांचे तळेगांवावर दादासाहेब हे इंग्रज यांजला घेऊन उतरले आहेत. आणि आपल्या फौजा अद्याप पुण्यावर आहेत. इंग्रज तर भारी दिसतो. आमची मात चालत नाही. आपण अवतारी आहांत. मुखाने जे निघेल तें खरें." श्रीमंत सवाई माधवराव साहेब यांणी सांगितले की, माझा दुसरा तीरकमठा आणून त्या प्रमाणे आणून देतांच डोळे वटारून कमानीस तीर लाविला. आणि बोलले की, उदईक इंग्रजांचा मोड होतो. तुम्ही तयार होऊन हल्ला करावी." तें बापूनों ऐकून हरीपंत तात्यास व पाटील बावांस चिठ्ठी लिहिली कीं, " महाराज धणी यांचा हुकूम जहाला की, तुम्ही उदईक तळेगांवावर हल्ला करावा. इंग्रजांचा मोड होईल." ती चिठ्ठी हरीपंत तात्या व पाटील बावा यांणी वाचून पाहून फौज तयार करून तळेगांवावर दुसरे दिवशी येऊन ज्या ठिकाणी इंग्रज उतरला होता त्याजवर मोठे युक्तीनें जाऊन दोन फे त्यांजकडील दोन फेरा होतांच इंग्रजांचे स्वार दहा हजार गर्द जहाले. हे पाहून एकदांच उडया घातल्या. आणि पलटणीत घोडे घालून 66 द्यावा. 98. मुंबईचा गव्हरनर हान्बो साहेब | होता. होता-इर= स्टुअर्ट हा एक त्याचा सरदार ।